
नामपूर (प्रतिनिधी ) महात्मा गांधी विद्यामंदीर संचलीत,समाजश्री प्रशांत दादा हिरे कला,विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय नामपुर येथे अपूर्व दत्तक योजनेनिमित्त गरीब अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश शिरुडे ऊपस्थित होते.महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य,माजी शिक्षक आमदार मा.डॉ अपूर्व भाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्थेच्या वतीने समाजातील गोरगरीब आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून अपूर्व दत्तक योजनेचे आयोजन करण्यात येते.

या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात येते.अपूर्ण दत्तक योजनेतील सर्व लाभार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे दत्तक पत्र म्हणून पाहुण्यांचे हस्ते त्यांना देण्यात आले तसेच सोबत लाभार्थ्यांचे पालक व पालकत्व घेणारे शिक्षक उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॅा.दिनेश शिरूडे यांनी सोनवणे माहेश्वरी अनिल या विद्यार्थिनीला दत्तक घेतले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.महेंद्र दासनूर यांनी गायकवाड अनुष्का गिरीधर या विद्यार्थिनीला दत्तक घेतले तसेच प्रा. राम बागुल यांनी पानपाटील हर्षदा तात्या ,प्रा.अमित सोनवणे यांनी अहिरे हर्षाली नामदेव या अनाथ विद्यार्थिनींना दत्तक घेतले.या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख वक्ते प्रा. सागर रौंदळ यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे जिवण चरीत्र ऊलगडुन दाखवले तसेच अपूर्व दत्तक योजने संदर्भात सखोल मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश शिरुडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कर्तृत्व ,नेतृत्व आणि चरित्र गुणांचा विकास होणे यासाठी शिस्तीचे धडे घ्यावे विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श घेतांना लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाची नेहमी स्मरण करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सागर रौंदळ तर आभार प्रदर्शन प्रा.अमित सोनवणे यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी सर्व महाविद्यालयीन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
