
लासलगाव ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ बुधवार दि. ३० जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येवला येथील एम. जी. व्ही. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ.अजिंक्य पाटील उपस्थित होते. त्यांनी “अर्थशास्त्रातील करिअरच्या संधी” या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील संधींविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत संवादात्मक पद्धतीने कार्यक्रम अधिक प्रभावी बनविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर उपयोग करत शिक्षणात यश मिळवण्याचा सल्ला दिला. त्यांनी अनेक यशस्वी महिलांचे प्रेरणादायी उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रांजल महानुभव हिने केले. तर प्रास्ताविक प्रा.सौरभ तिपायले यांनी आणि आभार प्रा. उषा आहिरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
