
मनमाड (प्रतिनिधी)मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने मनमाड शहर महावितरण कार्यालयात आज विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी महावितरणचे तडवी साहेब तळले साहेब सांगळे साहेब तसेच इतर अधिकारी यांच्यासोबत मनमाड शहरातील नागरिकांच्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला.

यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान दादा खान शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील हांडगे मनमाड शिवसेना शहरप्रमुख मयूर भाऊ बोरसे तसेच नगरसेवक महेंद्र शिरसाठ यांनी मनमाड शहरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून वीज खंडित होण्याच्या असंख्य तक्रारी येत असल्याचे सांगितले, सोबतच अनेक नागरिकांना वाढीव बिल येत असल्याने नागरिक त्रस्त असल्याचे सांगितले, वारंवार वीज खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागते आणि मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते,

महावितरण च्या वतीने लवकरात लवकर या समस्यांचे निराकरण करण्यात यावे, ठिकठिकाणी आलेल्या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करण्यात याव्या, लोड असलेल्या ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर टाकण्यावर सूचना करण्यात आल्या, यावेळी उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना केल्या जाईल आणि लवकरात लवकर तांत्रिक बिघाड दूर करून नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा करून देण्याचे कबूल केले. गेल्या काही दिवसांपासून ब्रेकर तुटणे तसेच तांत्रिक बिघाडामुळे मनमाड शहरवासी यांना विविध भागात वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. सदर परिस्थितीचे भान ठेवत शहर शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना तमिळ लवकरात लवकर वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचे आज सूचना करण्यात आल्या. याप्रसंगी पापा थॉमस आझाद पठाण सादिक तांबोळी संजय कटारिया मुकुंद झाल्टे सुभाष माळवतकर लोकेश साबळे पारस सूर्यवंशी प्रशांत पाटील असिफ पठाण सचिन दरगुडे कुणाल विसापूरकर आदींचे शिवसैनिक उपस्थित होते
