
नांदगाव (.मुक्ताराम बागुल ) नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर पूर्व भागात असलेल्या बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने शासनाच्या निकषाप्रमाणे नांदगाव पंचायत समिती कार्यालयाला अपात्र घरकुल लाभार्थ्यांची यादी पाठवून देखील अपात्र असलेल्या घरकुल लाभार्थ्यांची नावे पहिला हप्ता वर्ग केला आहे. हा नांदगाव पंचायत समितीचा भोंगळ कारभार उघडकीस आला असून पहिला हप्ता टाकणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास त्यांच्या विरोधात अमरण उपोषण करण्याचा इशारा रोहिले बुद्रुक येथील काही नागरिकांनी दिला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शासनाने प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेअंतर्गत सण 2024-2025 PMAY-G टप्पा क्रमांक दोन योजनेअंतर्गत रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत कडून पात्र/ अपात्र घरकुल लाभार्थ्यांची यादी मागविली होती. त्यानुसार विविध येथील प्रपत्र यादी समाविष्ट असलेल्या घरकुल लाभार्थी उद्दिष्ट देण्यात आलेले होते त्यापैकी नांदगाव पंचायत समितीच्या पत्रावरून ऑनलाइन कुटुंब पत्रकातील अपात्र लाभार्थ्यांची यादी नांदगाव पंचायत समितीला दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी आठ यादी (नावे) पाठविली होती. परंतु नांदगाव पंचायत समितीच्या घरकुल विभागातील अधिकाऱ्याने या यादीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून आमिषाला बळी पडून अपात्र लाभार्थ्यांची नावे पहिला हप्ता वर्ग केला आहे. हा प्रकार संबंधित घरकुल विभागाचे अधिकारी यांच्या व नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या निदर्शनास रोहिले बुद्रुक येथील नागरिकांनी निदर्शनास आणून देखील अद्याप जवळजवळ आजपर्यंत सहा ते सात महिने होऊन देखील अपात्र लाभार्थ्यांची नावे पात्र लाभार्थी यादी मधून कमी केलेले दिसून येत नाही. आज पर्यंत सात ते आठ महिने होऊन देखील संबंधित अधिकाऱ्यांने पात्र यादीतून त्यांची नावे त्यांनी का कमी केली नाहीत हा प्रश्न रोहिले बुद्रुक येथे चर्चा सुरू आहे. जर अपात्र लाभार्थ्यांची नावे पात्र लाभार्थी यादी मधून नावे आठ दिवसात कमी न झाल्यास 15 ऑगस्ट 2025 पासून अमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबत नांदगाव पंचायत समितीच्या घरकुल विभागातील अधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अपात्र घरकुल लाभार्थ्यांना नोटीसा पाठविलेल्या असून अद्याप पर्यंत अपात्र लाभार्थ्यांनी पैसे जमा केले नसून त्यांना आता स्मरण पत्र दिले जाईल. सदर स्मरणपत्र देऊन देखील पैसे जमा केले नाहीत तर त्यांच्या नावे असलेल्या शेताच्या सातबारा खाते उताऱ्यावर , ग्रामपंचायतीच्या नमुना रजिस्टर वर बोजा चढवण्याचे आदेश तलाठी ग्रामसेवक यांना देण्यात येतील व पात्र घरकुल लाभार्थी यादी मधून आठ अपात्र घरकुल आवडत्यांची नावे कमी करण्यात येतील असे सांगितले. तसेच अपात्र घरकुल लाभार्थ्याने बिन बुडाचा काही तथ्य नसल्याचा तक्रार अर्ज नांदगाव पंचायत समितीला दिला असून या तक्रार अर्जाचे देखील पंचायत समितीने आतापर्यंत दखल घेऊन कारवाई केल्याचे दिसून येत नाही. म्हणजेच या नांदगाव समिती कार्यालयामध्ये आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातं अशी गत झाली आहे.अमरण उपोषण करण्याचा इशारा रोहिले बुद्रुक येथील काही नागरिकांनी दिला आहे. यावर आता नांदगाव पंचायत समिती चे संबंधित अधिकारी व गटविकास अधिकारी हे काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे.
