
.रावळगाव.(प्रतिनिधी ) रावळगाव महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वृक्षारोपण“डोंगरावर हरित क्रांती – पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम”बकाल होणाऱ्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी रावळगाव येथील श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पिंपळगाव येथील डोंगरावर वृक्षारोपण तसेच बीजारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने रावळगावजवळील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले.

या वृक्षारोपणात पिंपळ, वड, करंज, बाभळी, सीताफळ, आवळा, जांभूळ अशा स्थानिक आणि औषधी झाडांची लागवड करण्यात आली. “डोंगरावर वृक्षारोपण केल्यामुळे जमिनीची धूप थांबेल, भूजल पातळी वाढेल आणि परिसरात हरितपट्टा निर्माण होईल.” मोकळ्या माळरानावर हिरवाई फुलवून तेथे धनदाट वन साकारण्याचा मानस प्राध्यापक व विद्याथ्यांनी केला आहे. सध्याच्या काळात असलेली काळात प्राणवायूची गरज आणि मानवी जीवनातील त्याचे असलेले महत्त्व प्रत्येकानेच अनुभवले. वाढत्या लोकसंख्येतून शहरीकरण, रस्ते, बांधकाम व उद्योगधंदे आदींसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे यापुढील काळात तरी निसर्गाचा प्रकोप मानवी समुदायावर होऊ नये व निसर्गाचा कायम समतोल साधला जावा यासाठी आजूबाजूच्या परिसरातील माळरानावर बोजारोपण करून पर्यावरणाचे संवर्धन करू, असे प्रतिपादन वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. अदिती काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा. कावेरी जाधव तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास पाचंगे यांनी परिश्रम घेतले. उपक्रमात वनस्पतीशास्त्र विभागाचे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. वनस्पतीशास्त्र विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजने तर्फे राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता. बागलाण जि. नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश वाघ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज यांनी केले.
