
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एन. पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासुताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, संचालक उत्तम श्रावण पोमनर होते. समवेत पर्यवेक्षक व्ही. डी. काळे सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने पालक उपस्थित होते. यांनी केले. त्यांनी मागील वर्षाचे पालक शिक्षक मेळाव्याचे इतिवृत्त वाचून दाखवले. यावेळी पालक संघाची नवीन कार्यकारिणीची बहुमताने निवड करण्यात आली. संघाचे पदसिद्ध अध्यक्षपदी प्राचार्य पी. एन. पवार, उपाध्यक्षपदी संतोष अहिरे व सचिव म्हणून एन. एस. अहिरे यांची बहुमताने निवड करण्यात आली. शिक्षकीय मनोगतात पी. एम. थोरे यांनी विद्यालयामार्फत वर्षभर राबविण्यात येणारे विविध उपक्रम, कार्यक्रम, जयंती महोत्सव, शैक्षणिक सहल आदींविषयी सविस्तर माहीती दिली. पर्यवेक्षक व्ही डी काळे यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीच्या बाबतीत पालकांना सूचना दिल्यात. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य पवार यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीक विकासासाठी संस्था व सर्व शिक्षक प्रयत्नशील असल्याचे पालकांना आश्वासित केले. आभार जेष्ठ शिक्षक डी. जे. देवरे यांनी मानलेत.
