
नामपुर (प्रतिनिधी ) समाजश्री प्रशांतदादा हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामपुर येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मा.केंद्रप्रमुख श्री.ए बी वाघ यांनी आमच्या महाविद्यालयात बैठक आयोजित केली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एफ शिरुडे अध्यक्षस्थानी होते. मा.अरुण वाघ यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण भाग 2025 चे कार्यवाही कशा पद्धतीने करावी. नागरिकांची प्रतिक्रिया व गुणांकन या संदर्भात महाविद्यालयाचे शिक्षक वृंदांना SBMSSG 2025 ही ॲप डाऊनलोड करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात तसेच आपल्या जवळचे ग्रामीण पालकांना या संदर्भात अभिप्राय नोंदवण्यासाठी मार्गदर्शन केले, तसेच महाविद्यालयाने सुद्धा विद्यार्थी व पालकांकडून या ॲपच्या संदर्भात जनजागृती करावी व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सर्वेक्षणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळावा, प्रतिक्रिया नोंदवाव्यात असे आव्हान केले,श्री. वाघ यांनी भेटी दरम्यान कॉलेज मार्फत राबविले जाणारे विविध उपक्रमांचे कौतुक केले आणि कामकाज पाहून समाधान व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी एफ शिरुडे यांनीही सर्व शिक्षकांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सहभाग नोंदवावा असे आव्हान सर्व शिक्षक वृंदांना केले या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एम व्ही दासनूर शैक्षणिक पर्यवेक्षक श्री.आर एस बागुल श्री.एस एस महाले श्री.ए एस जोशी श्री.एस आर निकम श्री.देसले आर बी श्री.पी पी महाले श्री.जी एच महाले श्री.एस एस पवार श्री.एस एम खैरनार श्री. सी डी ठाकोर श्री.जी के निकम श्रीमती.एस डी पाटील तसेच कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहविचार सभेसाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.आर एस बागुल यांनी केले.
