
सिन्नर ( प्रतिनिधी ) मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये दुर्गम आदिवासी भागातील जि.प.प्राथ.शाळा,राजुर मुली ता.अकोले या शाळेची विद्यार्थिनी कु.स्वरांगी सिताराम भांगरे हिने इ.२ री मध्ये १५० पैकी १५० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.या यशामागे तिची जिद्द,कष्ट याबरोबरच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी तिची आई मंदाताई भांगरे व प्रेरणा स्त्रोत वडील (प्राथ.शिक्षक) सिताराम भांगरे सर ,

मार्गदर्शक वर्गशिक्षिका मंदा भारमल मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .तिची मोठी बहीण कु. स्मिता भांगरे ही सुद्धा अतिशय हुशार असुन तिची मागील वर्षी नवोदय विद्यालय टाकळीढोकेश्वर येथे निवड झाली आहे.तिचे देखील मार्गदर्शन स्वरांगी हिस मिळाले.आदिवासी भागातील मुली कोणत्याच बाबतीत कमी नाहीत हे या मुलींनी आपल्या यशातुन दाखवुन दिले आहे.भविष्यात नवोदय विद्यालयात निवड हे तिचे ध्येय असुन मोठ्या पदावर जाण्याविषयी प्रचंड मेहनत घेणार असल्याचे तिने बोलण्यातुन स्पष्ट केले.तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत असुन अनेक संस्थानी स्वरांगीसह तिच्या पालकांचा देखील सन्मान केला आहे.तिच्या या यशाबद्दल आमदार डाॅ.किरण लहामटे ,डायट वरिष्ठ अधिव्याख्याते प्रा.अरुण भांगरे , गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत , विस्तार अधिकारी सविता कचरे , केंद्रप्रमुख श्री बाळासाहेब जाधव ,मुख्याध्यापक श्रीम साधना जाधव, वर्गशिक्षिका मंदा भारमल , आदिवासी प्राथ.शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष-प्रल्हाद कोंडार ,अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल मेचकर आदिंसह तालुक्यातील आदिवासी संघटना तसेच सर्व प्राथमिक शिक्षक अकोले तालुका यांनी स्वरांगीचे विशेष अभिनंदन केले असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.स्वरांगी भांगरे सह तिच्या पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे……

शब्दांकन महामित्र दत्ता वायचळे
(मा. ना. तहसीलदार , सिन्नर (नाशिक)
