
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९८३ वा दिवस
एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे हे पाप होय. हे पाप कधीही करु नका. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील, पण त्या सर्वच व्यक्त करत जाल तर हळूहळू राईचा पर्वत बनेल. तुम्ही जर क्षमा कराल आणि विसरुन जाल तर सारेकाही तिथेच समाप्त होऊन जाईल. आपल्या कृतीमुळे संघटनेच्या प्रतिष्ठेला, हिताला आणि प्रतिमेला कधीही धक्का बसता कामा नये, याचे प्रत्येक कार्यकर्त्याने निक्षून पालन करावे. आपण जनतेचे सेवक आहोत याचा आपल्याला क्षणभरही विसर पडू नये. त्यानेच आपली वागणूक योग्य राहण्यास मदत होईल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ९ श्रावण शके १९४७
★ श्रावण शुध्द /शुक्ल ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ३१ जुलै २०२५
★ सितला सप्तमी
★ १८६५ शिक्षणतज्ञ, मुंबईचे दानशूर जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा स्मृतिदिन.
★ १९१८ प्रसिध्द संस्कृत पंडित, विवेकानंद केंद्राची “केंद्रप्रार्थनेचे” लिहिणारे दादासाहेब तथा श्रीधर भास्कर वर्णेकर यांचा जन्मदिन.
★ १९४० क्रांतिकारक सरदार उधमसिंह यांचा स्मृतीदिन.
