
नांदगाव (प्रतिनिधी) व्ही. जे. हायस्कूल, नांदगाव येथे शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. संजीव धामणे व मुख्याध्यापक मा. श्री. लक्ष्मीकांत ठाकरे यांच्या संयोजनातून आणि उपमुख्याध्यापक डॉ. जोगेश्वर नांदुरकर यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून एक अभिनव उपक्रम साकारला आहे. तो म्हणजे मुद्रांकित शिक्षण. या उपक्रमात रोज प्रार्थनेच्या वेळी मुद्रा करून घेऊन त्यातून मुलांच्या शक्ती, बुद्धी, स्मृती, दया, क्षमा, शांती या सर्व गोष्टींचा विकास साधला जातो. मुलांना निव्वळ पारंपारिक शिक्षण देण्यापेक्षा काही वेगळ्या प्रकारचे शिक्षण देण्याचा हा प्रयत्न असल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

या उपक्रमाचे व्हिडिओ काढण्यात आले असून ते जागतिक समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहेत. या व्हिडिओना ओक्सफर्ड विद्यापीठातूनही likes मिळाले आहेत
