
नाशिकरोड:-( प्रतिनिधी )शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने सुहास दंडे यांचे ‘कैलास मानसरोवर यात्रा’ या विषयावर अत्यंत उदबोधक व्याख्यान संपन्न झाले. संस्थाध्यक्ष जयराम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व्याख्यानात श्री.दंडे यांनी मानसरोवर यात्रेबद्दलची सखोल माहिती दिली. वैद्यकीय तपासणी आणि दिल्ली येथील अंतीम वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यावर त्या सर्वांगाने योग्य असल्यासच पुढील यात्रेचे दरवाजे उघडले जातात. अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करूनच जून ते सप्टेंबर प्रवासाला जाण्यासाठी योग्य कालावधी असतो. नेपाळ, चीन येथील सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर कैलास पर्वतावर ४० किमीची प्रदक्षिणा आणि मानसरोवर येथील ७० किमी पायी खडतर प्रवास करावा लागतो. जेव्हा सूर्याची कोवळी किरणे कैलासावर स्पर्श करतात; तेव्हा सर्व पर्वत सोन्याचा झाल्याचे दृश्य पाहून सर्व शीण क्षणार्धात नाहीसा होतो, असे सांगून उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. अध्यक्ष जयराम कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर प्रवास वर्णन कथन करणाऱ्या सुहास दंडे यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव अविनाश गोसावी, उपसचिव श्रीकांत मोहरील, अनिल सहस्रबुद्धे, विजय गीत, शामसुंदर कुलकर्णी, चांगदेव बोराडे, ॲड.गोविंद पांडे, चंद्रकांत झाडीकर, सदानंद पालकर, श्रीवल्लभ कुलकर्णी, संजय चंद्रमोरे, पंढरीनाथ अगोने, सुनंदा गोसावी, वैजयंती चंद्रात्रे, मेखला रास्वळकर, शालिनी डहाळे, मृणाल प्रभुणे, मंगल मोहरील, वैदेही कुलकर्णी, शैलजा कुलकर्णी, सुधा कुलकर्णी, माणिक कुलकर्णी, सुधा डमरे यांनी विशेष परिश्रम घेतले. शरद वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. शिल्पा वैद्य यांनी त्रिवार ॐकार आणि गुरुवंदना म्हटली. रवींद्र चंद्रात्रे यांनी सभासद वाढदिवस सत्काराचे निवेदन करून आभार मानले.फोटोओळी:- शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या व्याख्यानात बोलताना प्रमुख वक्ते सुहास दंडे. समवेत डावीकडून शरद वैद्य, सचिव अविनाश गोसावी आणि अध्यक्ष जयराम कुलकर्णी.
