
लासलगाव ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेतलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला निफाड येथील गणपत दादा मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानोबा ढगे सर हे प्रमुख पाहुणे लाभले त्यांनी “राज्यशास्त्र आणि भविष्यातील करिअरच्या संधी” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना राज्यशास्त्रातील विद्यार्थ्यांनी सक्रियपणे राजकीय क्षेत्रात सहभाग नोंदवला पाहिजे.

राज्यशास्त्र केवळ तुम्हाला पदवी पुरते मर्यादित नाही, तर समाजातील तुमचा राजकीय सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. राज्यशास्त्रातून राजकीय असिस्टंट, पत्रकार, पॉलिसी मेकर अशा नव-नवीन संधी निर्माण होत आहेत याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेत नीतिमत्तापूर्ण शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. मोठे स्वप्न पहा, त्यासाठी अविरत मेहनत करा, येणारा काळ तुम्हाला संधी उपलब्ध करून देईल त्यासाठी तरुणांनी महाविद्यालयीन शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान देखील मिळविले पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम क्षीरसागर या विद्यार्थ्याने केले तर प्रास्ताविक रूपाली पाडेकर आणि आभार प्रदर्शन प्रिया जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.मारोती कंधारे आणि प्रा.वाल्मीक आरोटे यांनी केले. या कार्यक्रमाला राज्यशास्त्र विभागातील द्वितीय आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
