
गारगोटी ( प्रतिनिधी) समाजामध्ये मुलांना बीघडविणारी अनेक ठिकाणे निर्माण होत आहेत त्यापासून मुलांना दूर ठेवायचे असेल तर त्यांच्यावर छंदाचे जाणीवपूर्वक संस्कार करा मुलांना आनंद तर मिळेलच पण त्याचबरोबर देशाला कला साहित्य खेळ या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळविणारे हिरो मिळतील असे मत ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबुराव शिरसाठ यांनी व्यक्त केले. ते वेंगलुर तालुका भुदरगड
येथे श्री आनंदराव देसाई हायस्कूलमध्ये व्हिलेज लाईफ फाउंडेशन मुंबईतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते शिरसाठ यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे सचिव एन के देसाई होते फाउंडेशनचे विश्वस्त सागर शिंदे यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून फाउंडेशन गेली पाच वर्ष गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहे शिरसाठ पुढे म्हणाले छंद नसली तर मुलांच्या मध्ये निराशा येऊ शकते त्याकरिता आनंद देणाऱ्या छंदाचे संस्कार रुजवा. यावेळी दैनिक सकाळ मुंबई चे व्यवस्थापक दिनकर कोकितकर विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते बाल साहित्यिक शिरसाठ यांनी आपल्या कथा कवितांचे यावेळी वाचन केले आणि मुलांकडून कविताही करून घेतल्या त्यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला शेवटी ए.एम. पाटील यांनी आभार मानले.तर रणजीत भांडेकर यांनी सुत्रसंचलन केले.
