
नाशिक (प्रतिनिधी )आज दिनांक ३० जुलै २०२५ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक संजयकुमार राठोड साहेब यांची महा अंनिस नाशिकरोड शाखेच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन शाळांमध्ये अंनिस चे उपक्रम (शिक्षक प्रशिक्षण) राबविण्यासाठीचे अधिकृत पत्र मिळावे, यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यास राठोड साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी नाशिक जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव सर यांनी त्यांचा ‘काफिरनामा’ कविता संग्रह व नाशिक रोड शाखेच्या प्रधान सचिव डॉ. सिल्केशा अहिरे मॅडम यांनी त्यांचे पुस्तक ‘डाॅ. शांताबाई दाणी प्रबंध’ राठोड साहेबांना सस्नेह भेट दिले. या भेटी प्रसंगी नाशिकरोड शाखेच्या कार्याध्यक्ष ॲड. स्वाती वाहूळ व नाशिक जिल्हा विविध उपक्रम विभागाचे कार्यवाह विजय बागुल हेही उपस्थित होते.
