
नांदगाव (वार्ताहार )-” दिनांक २९/०७/२००२५ रोजी व्ही.जे हायस्कुल नांदगाव या ठिकाणी ‘नागपंचमी’ या श्रावण महिन्यातील प्रथम सण या सणाचे औचित्य साधून साप व नागविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा व विविध गैरसमज दूर करण्यासाठी सर्व मित्रांद्वारे सकाळ सत्र व दुपार सत्रातील विद्यार्थ्यांसाठी जन जागृती करण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था,

नांदगाव या संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रभाकर निकुंभ सर ,उपाध्यक्ष श्री. मंगेश आहेर हे उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांचे सहकारी श्री. पंकज शर्मा, ललित मोकळ ओमकार इघे ,मयूर आहेर हे उपस्थित होते. त्याच बरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्री. ल. ना ठाकरे उपमुख्या श्री जोगश्वर नांदूरकर सर व टी.एम. बोर्ड सदस्य श्री. मधे भास्कर . श्री. गुलाब बाटील सर व शिक्षक प्रतिनीधी श्री. प्रविण आहिरे श्री. सुरेश नवसारे व सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होतेहा कार्यक्रम विज्ञान छंद मंडळार्गत आयोजित करण्यात आला असून प्रथम श्री. प्रभाकर निकुंभ या सराच्या हस्ते प्रयोगाच्या हस्ते विज्ञान बंद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. श्री. प्रभाकर निकुंभ सर यांनी लोकांमध्ये सापाविषयी असलेला गैरसमज, भीती हे दूर व्हावे यासाग ” शुन्य सर्पदंश जागृती हे अभियान” सुरु केले. ते तू त्याचे सहकारी ह्या अभियानातंर्गत विद्याध्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष वेगवेगळ्या प्रकारच्या व्हीडीओ च्या माध्यमातून सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्पदंशाबाबत जागृती विद्याध्यामध्ये घडवून आणली.त्याच बरोबर सरांनी भारतामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे बिनविषारी साप, विषारीसाप, निमविषारी साप ह्या सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती व त्याच्या शरीररचना ह्या विषयी प्रत्यक्ष पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादरीकरणा द्वारे विद्यार्थ्यांना समजावून दिल्या.तसेच साम्य असलेले नाग व त्यातील फरकही त्यांनी स्पष्ट करून करून सांगितला.सर्पदंश झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे प्रथमोपचार करावे हे ही सांगितले प्रचलित असलेल्या व चुकीच्या प्रथमोपचार पद्धती विषयीही माहिती दिली. तसेच काही विद्यार्थ्याचे सर्पदंशा विषयी असलेल्या शंकाचे निरसनही केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सकाळ सत्रातील इ ८वी आसावरी गायकवाड दुपार सत्रात शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. झोडगेकर मॅडम यांनी केले.प्रमुख पाहुण्याचे परिचय विज्ञान शिक्षक श्री. राकेश नन्नावरे सर यांनी केले. माननीय मुख्याध्यापक श्री.ठाकरे सर व श्री.गुलाब पाटील सर पाहुण्याचे स्वागत केले.कार्यक्रमाचे आभार सकाळ सत्रात श्रीमती देवरे सुनिता व दुपार सत्रात श्री. गुलाब पाटील सर यांनी मानले व अशा प्रकारे उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रमाची सांगता झाली
