
नांदगाव (प्रतिनिधी) वन्य जीवांचे संरक्षण ही काळाची गरज आहे सर्प हा निसर्ग चक्राचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता अशा उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाची आणि संवर्धनाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता अशा उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाची व संवर्धनाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे यांनी केले. मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे प्राणीशास्त्र विभागातर्फे पर्यावरण संवर्धन व वन्यजीव जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष मंगेश आहेर, सचिव पंकज शर्मा,व टीम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय मराठे, सिनेट मेंबर डॉ.सी.बी.निगळे, प्रा. के. आर. खंदारे,प्रा. एस.सी.आहिरे. प्रा. श्रीमती प्राजक्ता कडलग, व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे तालुकाध्यक्ष व सर्पमित्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर निकुंभ यांनी सर्पाविषयी समाजात असलेले गैरसमज त्याचे जैविक महत्त्व आणि त्यांचे संवर्धन का आवश्यक आहे यावर अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एम.बी.आटोळे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.प्रतिभा जाधव यांनी केले. तर प्रा. अंकुश लव्हाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी सर्प संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
