.

*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९८२ वा दिवस* धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती होय. धर्म म्हणजे केवळ निरर्थक बडबड नव्हे. मतवाद नव्हे, सिद्धांत नव्हे, मग ते सिद्धांत कितीही सुंदर असोत. आत्मा हा ब्रम्हस्वरूप आहे हे जाणून तद्रूप होणे, त्याचा साक्षात्कार करून घेणे म्हणजेच धर्म होय. धर्म ही केवळ ऐकण्याची किंवा बौद्धिक संमती देण्याची वस्तू नाही. ज्या सत्यावर आपला विश्वास आहे, त्याच्याशी आपल्या आत्म्याचे एकरूप होऊन जाणे म्हणजेच धर्म होय. मंदिर म्हणा की शास्त्रग्रंथ म्हणा; सर्वच धर्मजीवनाच्या बाल्य अवस्थेतील केवळ सहाय्यक साधने आहेत ती धर्म जीवनाचे अंतिम उद्दिष्ट वा लक्ष्य असू शकत नाहीत. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर ८ श्रावण शके १९४७*
★ श्रावण शुध्द /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ३० जुलै २०२५
★ १६२२ संत तुलसीदास यांचा स्मृतीदिन.
★ १९६० कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा स्मृतिदिन
★ १९८३ शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचा स्मृतिदिन
★ १९९५ अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचा स्मृतीदिन.
