
पिंपळगाव बसवंत–(प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय पिंपळगाव बसवंत येथे नागदेवता प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री डेर्ले एस.एन सर यांच्या हस्ते नागदेवतेच्या प्रतिमेचे व वारुळाचे पूजन करण्यात आले.कुमारी प्राजक्ता आहेर, प्रणव आथरे या विद्यार्थ्यांनी नागपंचमी या सणाविषयी माहिती सांगितली. शिक्षक मनोगत विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीम चव्हाण एस.आर मॅडम यांनी नागपंचमीचे नागपंचमी, हा नाग किंवा साप यांच्या पारंपारिक पूजेचा दिवस आहे.

भारत आणि नेपाळ या देशात हा सण साजरा केला जातो .पाचव्या दिवशी (जुलै/ऑगस्ट) ही पूजा केली जाते. कर्नाटक, राजस्थान, बिहार आणि गुजरात सारखी काही भारतीय राज्ये त्याच महिन्याच्या कृष्ण पक्षाला नाग पंचमी साजरी करतात. उत्सवाचा एक भाग म्हणून, चांदी, दगड, लाकूड किंवा चित्रापासून बनवलेल्या नाग किंवा सर्प देवतेला दुधाने आदरपूर्वक स्नान किंवा अभिषेक केले जाते आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी त्यांचे आशीर्वाद मागितले जातात.

काही प्रदेशात या दिवशी जिवंत सापांची, विशेषतः नागांची, पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सातवी( ब) च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी इच्छा पवार व ईश्वरी शेटे यांनी केले. आभार प्रदर्शन संचिती विधाते यांनी केले.फलक लेखन कलाशिक्षक अनिल शिरसाठ यांनी केले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
