
नायगाव (प्रतिनिधी): गेल्या दोन-तीन दिवसांपुर्वी झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असतानाच, श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी नायगाव आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने माहेरी आलेल्या लेकीबाळी, वारुळाची आणि नागदेवतेची पूजा, तसेच झोक्यांचे खेळ अशा पारंपरिक वातावरणात सर्वत्र चैतन्य दिसून आले.नागपंचमी हा विशेषतः महिला आणि मुलींचा आवडता सण. या दिवशी विवाहित मुलींना माहेरी आणण्याची प्रथा आजही जपली जाते. त्यांना ‘काकण चोळी’ देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यावर्षीही ही परंपरा मोठ्या उत्साहात पाळण्यात आली. घरोघरी महिलांनी वारुळाची आणि नागदेवतेच्या प्रतिमेची मनोभावे पूजा करून कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली. अनेक गावांमध्ये तरुणाई आणि महिलांनी झाडांना झोके बांधून त्याचा मनसोक्त आनंद लुटला.मात्र, या सणाचा एक अविभाज्य भाग असलेला ‘भुलई’ या पारंपरिक खेळाचा आता विसर पडत चालल्याची खंत अनेक जुन्या-जाणत्यांनी व्यक्त केली. पूर्वी माहेरी आलेल्या सर्व लेकी एकत्
