
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आरोग्य विषयक समुपदेशन कार्यशाळे प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री नरेंद्र पवार, यांच्या समवेत डावीकडून प्रा. शरद आंबेकर, उपप्रचार्य प्रा. जितेंद्र मिसर, संस्थेच्या अध्यक्ष वैशालीताई वाघ, दिपक निकम.
रावळगाव(प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे रेड रिबन क्लब अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आरोग्य विषयक समुपदेशन कार्यशाळा संपन्नमहाविद्यालयीन विद्याथ्यांनी आपल्या सर्वोत्तम आरोग्यास प्राधान्य देणे गरजेचे – श्री नरेंद्र पवार रावळगाव :- श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण रुग्णालय दाभाडी येथील एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र (ICTC) यांच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आरोग्य विषयक समुपदेशन कार्यशाळा श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाने ता. बागलाण जि. नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई वाघ यांच्या उपस्थितीत सपन्न झाली. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र (ICTC) प्रमुख नरेंद्र पवार, कक्ष सहाय्यक दिपक निकम हे उपस्थित होते, तर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर हे उपस्थित होते, यावेळी ग्रामीण रुग्णालय दाभाडी येथील एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र (ICTC) यांच्या वतीने महाविद्यालयास सूचना फलक भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. धनंजय रौंदळ, प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास पाचंगे यांनी केले, त्यात त्यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत येणाऱ्या रेड रिबन क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. तर या कार्यशाळेचे आभार प्रदर्शन प्रा. कामेश गायकवाड यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले नरेंद्र पवार – दाभाडी एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र (ICTC) प्रमुख म्हणाले की, “तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सजग राहणे आवश्यक आहे. एड्ससारख्या आजारांबाबत जनजागृती होणे काळाची गरज असे, सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक गैरसमज दूर केले. या कार्यशाळेचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखुन सर्वांनी आरोग्य विषयक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे मत व्यक्त केले.

एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र (ICTC) यांच्या वतीने महाविद्यालयास सूचना फलक भेट स्वरूपात संस्थेच्या अध्यक्ष वैशालीताई वाघ यांना प्रदान करताना श्री नरेंद्र पवार, दिपक निकम यांच्या समवेत उपस्थित प्राध्यापक
या कार्यशाळेस प्रा. शरद आंबेकर प्रा. अंबादास पाचंगे, प्रा. भरत आहेर, प्रा. प्रशांत निकम, प्रा. कल्पेश खेरनार, प्रा. अक्षय चव्हाण, प्रा. वर्षा पवार, प्रा. गीतांजली खैरनार, प्रा. अदिती काळे, प्रा. कावेरी जाधव, प्रा. मोहिनी आहेर, प्रा. सोनंम पाटील, प्रा. चेतना हिरे, प्रा. देवयानी निकम, प्रा. आकांश शेलार, प्रा. शिवानी शेवाळे, यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
