
सोनांबे (बातमीदार): श्री दशनाम गोसावी समाज संस्था, सिन्नर यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व तालुका समाज मेळावा नुकताच सिन्नर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र गिरी होते.या सोहळ्यास माजी जिल्हाध्यक्ष सूर्यभान गोसावी, बाळासाहेब गोसावी, संजय गोसावी व किशोर भारती हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समाजातील शिक्षण व यशाची ओळख ठरलेल्या या सोहळ्यात इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती पात्र (4), दहावी (18), बारावी (11) तसेच पदविका, पदवी व पदव्युत्तर (15) अशा एकूण 48 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना रामभारती गोसावी यांनी स्मृतिचिन्ह, भानुदासपुरी गोसावी यांनी शैक्षणिक साहित्य आणि भैरवनाथ गोसावी यांनी प्रमाणपत्रांचे सौजन्य दिले. काशिनाथ गोसावी, सौ. कमल गिरी व दीपक गोसावी यांनी रोख स्वरूपातील पारितोषिक देवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या समाजबांधवांचाही गौरव करण्यात आला. दत्तात्रय गोसावी (समाजभूषण), सोमनाथ गिरी (आदर्श शिक्षक), संजय गिरी (जिल्हा सरचिटणीस, ग्रामसेवक संघटना), डी. झेड. बन (ग्रामविकास अधिकारी), सुमित गोसावी (महाराष्ट्र पोलीस), प्रवीण व संदीप गोसावी (उद्योजक), भूषण गोसावी (भारतीय जवान), संजीव गोसावी (कृषी अधिकारी), सोनाली गिरी (शिक्षण सेवक) व दिलीप गोसावी (सेवानिवृत्त) यांचा सन्मान स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला. या सोहळ्यासाठी सुरेश गोसावी, सुकदेव गोसावी, दत्तात्रय गोसावी, डॉ. अशोक गोसावी, शरद गोसावी, गुलाब गोसावी, संजय गिरी, डि.झेड. बन, पंडित गोसावी, संजय गोसावी, दौलत गोसावी, छगन गोसावी, विठ्ठल बावा, अनिल गोसावी, सुभाष गोसावी, अंबादास भारती आदींनी रोख स्वरूपात दिलेल्या देणग्यांमुळे कार्यक्रम अधिक भव्यतेने साजरा झाला.रविंद्र गिरी यांच्या वतीने सर्व उपस्थित समाजबांधवांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरचिटणीस वसंत गोसावी यांनी केले. ओंकारेश्वर आरती पठणाने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली. हा सोहळा समाज एकतेचे प्रतीक ठरून, पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
