
सिन्नर (प्रतिनिधी)श्रावण मासानिमित्त टी.जे.चौहान विद्यालयात माता मेळावा कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मानसोपचार तज्ञ डॉक्टर सौ.स्वाती चव्हाण वंजारी मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित मातांना मानसिक आरोग्य कसे जपावे , स्वतःसाठी वेळ कसा काढावा हे हसत खेळत समजावून सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात ईश स्तवनाने झाली. मिताली झोले , शर्वरी कंक यांनी सुंदर नृत्याविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. हरित सेने अंतर्गत “एक पेंड मॉ के नाम “या उपक्रमाची माहिती पालकांना देऊन वृक्षारोपणा बाबत आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात चालू शैक्षणिक वर्षाच्या माता पालक संघाची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत तसेच माजी पदाधिकाऱ्यांचे आभार सन्मा. मुख्याध्यापिका उज्वला माळी यांनी गुलाब पुष्प देऊन केले. या कार्यक्रमासाठी सन्माननीय मुख्याध्यापिका उज्वला माळी मॅडमाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता सुरेल अशा समारोप गीताने करण्यात आली.
