
सिन्नर (प्रतिनिधी )नागपंचमीच्या निमित्ताने सापांची ओळख..*सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था, सिन्नर संचलित सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिरात नागपंचमी या सणाच्या निमित्ताने सापांच्या विविध जातींची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता राजगुरू यांनी भुषविले.नागपंचमी बाबतची पारंपारिक आणि प्राचीन काळापासून सुरू असलेले सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी तर ‘मी आहे कोब्रा’ ‘मी आहे नागराज’ ‘मी आहे अजगर’ असे सांगत त्या त्या जातीच्या सापांची चित्रासह माहिती सांगितली. त्यानंतर श्रीमती रोहिणी मिठे यांनी विषारी व बिनविषारी असे सापांचे प्रकार असतात आपण सापाच्या दंशाने मृत्युमुखी पडू की काय या भीतीने माणसे सापाला मारतात तसे न करता साप कोणता होता हे पाहून त्यावर घाबरून न जाता औषधोपचार करावा असे प्रतिपादित केले तसेच साप हा शेतकऱ्यांचा मित्र कसा आहे याबाबतीत विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर मुख्या.सौ. संगीता राजगुरू यांनी साप दिसल्यानंतर मारण्यापेक्षा सर्पमित्रांना बोलवावे. सापांची नाहक हत्या करू नये अशी जागृती केली व आपण नागपंचमी कशी साजरी करतात यावर चर्चा केली.या कार्यक्रमास संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री.राहुल वरंदळ आणि संकुलाचे मुख्याध्यापक श्री. मधुकर देशमुख सर यांनी उपस्थिती दर्शवली देशमुख सरांनी देखील विद्यार्थ्यांना सणाबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन श्रीमती दिपार्ती आहेर यांनी केले. अशा रीतीने नागपंचमीनिमित्त उपकारक असलेल्या सापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
