
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९८१ वा दिवस
आपल्या प्रत्येकाच्या प्रामाणिक प्रयत्नावरच, कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे रहस्य संघटना, शक्तिसंचय व इच्छाशक्तीचे परस्पर सहकार्य यातच साठलेले आहे. देशाचे पुनरुत्थान, पुनर्बांधणी, पुनर्निर्माण करण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी केंद्रित आणि संघटीत होऊन आपले बळ एकवटले पाहिजे. याच वेळी ऋग्वेदातील पुढील अपूर्व मंत्र माझ्या स्मरणात येत आहे.
“सं गच्छध्वं सं वदध्वं सं वो मनांसि जानताम्…..”
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ७ श्रावण शके १९४७
★ श्रावण शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २९ जुलै २०२५
★ नागपंचमी
★ मंगळागौर प्रथम दिवस
★ १९०४ भारतीय नागरी विमान वाहतूकीचे जनक, वैमानिक, सुप्रसिध्द उद्योगपती, भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाॅय तथा जे. आर. डी. टाटा यांचा जन्मदिन.
★ १९२२ इतिहासकार, लेखक शिवशाहीर बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्मदिन.
★ १९४६ टाटा एअरलाईन्सचे राष्ट्रीयीकरण करुन ‘एअर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.
