
जळगाव निंबायती (वार्ताहर) – अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंतीचे औचित्य साधून वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासुताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे होते. समवेत प्राचार्य पी. एन .पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डी. जे. देवरे यांनी केले होते. लोकमान्य टिळक यांचे जीवनकार्य या विषयावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत लहान गटात रोशनी कांबळे प्रथम, प्राची पटांग्रे द्वितीय आयुष दुकळे तृतीय तर मध्यम गटात संतोषी माने प्रथम, राखी जगताप द्वितीय, आराध्या मोरे तृतीय तसेच मोठ्या गटात राजेश्वरी हुलगुंडे प्रथम, क्षितीजा देवरे द्वितीय, संजीवनी दुकळे तृतीय यांनी बक्षिसे पटकावली. स्पर्धेचे परीक्षण श्रीमती. एस. डी. गायकवाड व आर जे जाधव यांनी केले. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागाचे सदस्य ए. म. साळुंखे यांनी केले. तर आभार नरेंद्र अहिरे यांनी मानलेत.
