
देवळा (प्रतिनिधी ) लवखाड मळ्यातील तुकाराम दाजीबा वाघ गट नंबर 196 या तसेच पंचक्रोशीतील शिवारात दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभाग देवळा कार्यालयाला यश मिळाले. आज सोमवार दि २८/०७/२५ रोजी रात्री ०९ – २५ वा लवखाड मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट अडकला असुन वन विभाग कर्मचारी मेजर विजय पगार जी जी पवार ठाकरे भदाणे आदींसह इतर कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन नागरिकांना सावधानतेचा सुरक्षितता बाबत इशारा देवून सदरील बिबट्याला आपल्या ताब्यात घेतले. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजून दोन ते तीन बिबट सदर परीसरात वास्तव्यास असुन पंचक्रोशीतील परीसरात दहशतीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. तरी पुनश्च पिंजऱ्याची मागणी केली जात आहे. उत्तम उच्चतम उत्कृष्ट कार्याबद्दल वरीष्ठ वन विभाग देवळा अधिकारी कर्मचारी यांचे ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅श्री संजय दहिवडकर अध्यक्ष ग्रामविकास समिती दहिवड.
