
लासलगाव ( प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा आयोजित विद्यार्थी संवाद कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे यांनी केले. त्यांनी सदर उपक्रम महाविद्यालयात किती प्रभावीपणे राबवला जातो हे प्रास्ताविकातून सांगितले. सदर संवाद कार्यशाळेसाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष माननीय श्री.यशवंत शितोळे उपस्थित होते. श्री.यशवंत शितोळे यांनी आपल्या उद्बोधनपर भाषणात महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी एस.आय.पी. करणे खूप गरजेचे आहे एस. आय. पी. चा अर्थ सांगत असताना सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट फॉर करिअर डेव्हलपमेंट असा स्पष्ट केला. करिअर कट्टा अंतर्गत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कोण-कोणते वेगवेगळे उपक्रम राबवले जातात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उज्वल भवितव्यासाठी विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योजक आपल्या भेटीला, तसेच आयएएस आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोजित स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, केंद्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा यासंबंधीतील मार्गदर्शन केले जाते याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.(डॉ.) आदिनाथ मोरे यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केले की करिअर कट्टा सारखा उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन महाविद्यालयीन जीवनात आपण आपले उज्वल भविष्य बनवू शकतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसशास्त्र विभागाचे प्रा.किशोर अंकुळनेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन संगणकशास्त्र विभागाचे प्रा.सुनिल भागवत यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ. संजय निकम, डॉ. मारोती कंधारे, प्रा.विरेंद्र आहेर, प्रा.सृष्टी थोरात इ. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
