
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून आदिवासी तळे वस्ती येथे अखेर वीज पोहचली.
चाळीस वर्षांपासून अंधारात असलेल्या आदिवासी वस्तीवर अखेर प्रकाशाचा किरण पोहोचला आहे. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नांमुळे वस्तीवर वीज पोहोचविण्यात यश आले. या ऐतिहासिक आणि आनंददायी क्षणाचे उद्घाटन सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी बांधवांना विजेच्या अभावामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. शालेय शिक्षण, आरोग्य सेवा, व रोजच्या जीवनातील सुविधा यावर मोठा परिणाम होत होता. या परिस्थितीची दखल घेत आमदार कांदे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी झालेल्या नवी डीपी च्या माध्यमातून वस्तीवरील शंभर घरांना वीजपुरवठा होणार आहे.
उद्घाटन सोहळ्याच्या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांचे आभार मानले. स्थानिकांनी त्यांच्या भावना व्यक्त करत आमदारांच्या या कार्याची स्तुती केली.

या उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांचे शिक्षण, स्थानिक रोजगार व जीवनशैलीत सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास अंजुमताईंनी व्यक्त केला.
याप्रसंगी महावितरणचे अधिकारी संदीप मते साहेब, भाऊराव बागुल, प्रमोद भाबड, भगवान शेठ देशमुख, कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब आव्हाड, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी माई कातकडे संगीता ताई बागुल रोहिणी ताई मोरे आदींसह मोठ्या संख्येने वस्तीवरील नागरिक उपस्थित होते
