
.नांदगाव:(प्रतिनिधी ) दिनांक ५ मार्च २०२५ ते ०४ मार्च २०३० या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होवुन गठीत होणाऱ्या नांदगांव तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीकरीता मुंबई ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील नियम २-अ च्या पोट नियम (१) व (२) अन्वये मा. जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक कक्ष-२/१/ग्रांप./E-५७१६०८५/२०२५ दिनांक १७/०७/२०२५ अन्वये सरपंच पदाचे प्रवर्ग निहाय निश्चित करुन दिलेले आहे. नांदगांव तालुक्यातील दिनांक ५ मार्च २०२५ ते ०४ मार्च २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती करीता तालुका निहाय सरपंच पदाचे प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे.त्या अनुषंगाने सदर आरक्षण थेट/ सोडतीने निश्चित करण्याकरीता जिल्हाधिकारी नाशिक, यांचेकडील आदेशान्वये आज दिनांक २८/०७/२०२५ रोजी सभा आयोजीत करण्यात आलेली असुन त्याकरीता तहसिलदार सुनील सौंदाने नांदगाव यांना प्राधिकृत अधिकारी म्हणुन नेमण्यात आले. त्यानुसार तहसिल कार्यालय नांदगाव येथे खालील प्रमाणे सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
अनुसुचित जातीसाठी एकुण ६१. वडाळी खु, २. नवसारी, ३. गोंडेगाव, ४. पानेवाडी, ५. हिसवळ बु. ६. भालुरअनुसुचित जमाती साठी एकुण १२१. हिसवळ खु. २. बेजगांव, ३. कही, ४. क्रांतीनगर, ५. दहेगांव, ६. चिंचविहीर, ७. वंजारवाडी, ८. भार्डी, ९. जवळकी,१०. टाकळी बु. ११. गंगाधरी, १२. शास्रीनगर
नागरीकांचा मागासप्रवर्ग साठी एकुण २४१. पळाशी २. मंगळणे, ३. हिंगणदेहरे, ४. जातेगांव, ५. वाखारी, ६. श्रीरामनगर, ७. हिंगणवाडी, ८. तळवाडे, ९. मोहेगांव, १०. धोटाणे बु. ११. बाभुळवाडी, १२. अनकवाडे, १३. मांडवड, १४. चादोरा, १५. धनेर, १६. हिरेनगर, १७. कसाबखेडा, १८. माणिकपुंज, १९. अस्तंगांव, २०. पांझणदेव, २१. मुळडोंगरी, २२. बिरोळे, २३. साकोरा, २४. कासारीसर्वसाधारण साठी एकुण ४६१. टाकळी खु. २. बाणगांव बु..३. बोराळे, ४. खादगांव, ५. जामदरी, ६. दहेल, ७. मल्हारवाडी, ८. कुसुमतेल ९. फुलेनगर, १०. गिरणानगर, ११. बोयेगांव, १२. पिंपरखेड, १३. घोटाने खू. १४. नागापुर, १५. लोढरे, १६. लक्ष्मीनगर, १७. ढेकु खु.,१८. मळगांव, १९. वेहेळगांव, २०. नवे पांझन, २१. कॉढार, २२.खिर्डी, २३. सोयगांव, २४.एकवई २५. बाणगांव खु. २६. लोहशिंगवे, २७. परधाडी, २८. पिंप्रीहवेली, २९. बोलठाण, ३०. न्यायडोंगरी, ३१. पिंप्राळे, ३२. भौरी, ३३.पोखरी, ३४. जळगांव खु. ३५. जळगांव बु., ३६. रोहीले बु. ३७. आमोदे, ३८. सावरगांव, ३९. सटाणे, ४०. मोरझर, ४१. तांदुळवाडी, ४२. रणखेडे, ४३. कळमदरी, ४४. वडाळी बु.४५. नांदुर, ४६. माळेगांव (क).तसेच
वरील आरक्षणापैकी ५०% आरक्षण महिला करीता राखीव असुन दिनांक ३०/०७/२०२५ रोजी उपविभागीय अधिकारी येवला हे तहसिल कार्यालय नांदगांव येथे आरक्षण जाहीर करणार आहे.
