
नांदगाव = मविप्र संचलित आदर्श प्राथमिक शाळा, नांदगाव येथे आज रोजी नागपंचमी सण शाळेत उत्साह साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना नागपंचमीचे महत्व सांगून त्यांच्या विषयी जनजागृती करण्यासाठी माननीय मुख्याध्यापक श्री साळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र अध्यक्ष श्री प्रभाकर निकुंभ व त्यांचे सहकारी, ललित मोकळ, मंगेश आहेर, वि.जे.एस.एस. ग्रुप नांदगाव, यांनी विद्यार्थ्यांना सर्व सर्प जातीच्या विषारी व मध्यम विषारी व अविकारी सापांची छान प्रकारे माहिती दिली

आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे उपाययोजना करण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले व श्री संजय जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना नागपंचमी विषयी माहिती सांगितली यावेळी शाळेतील कार्यक्रम यशस्वी होण्याकरता सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले… व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिरसाठ सर यांनी केले…
