
मखमलाबाद विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करतांना प्राचार्य संजय डेर्ले,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका सविता आहेर, भाग्यशाली जाधव,सुनिता उशीर, प्रमोद पगार उपस्थित होते.सांस्कृतिक समिती उपप्रमुख ज्येष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.

त्यांनी सांगितले की,भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून पद भूषविणारे डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम हे “मिसाईल मॅन” म्हणून ओळखले जातात.वैज्ञानिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे अतिशय महान आहेत.भारत जगामध्ये शक्तिशाली होण्यासाठी नवीन पिढी म्हणजेच शालेय व कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी सतत संवाद साधून वैज्ञानिक क्षेत्राबद्दल मार्गदर्शन केले. मिसाईल क्षेत्रातील त्यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद होते म्हणूनच त्यांना “मिसाईल मॅन” ही पदवी मिळाली होती.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका सुनीता उशीर यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
