
नाशिक ( बातमीदार- )कविता लिहीण्याचे संस्कार हे लहानपणापासून होणे गरजेचे असते. कवितेची समज येऊ लागते विचार परिपक्व होतात अनुभवांची व्यापकता वाढते तसतशी कविता बदलत जाते हा कवितेच्या समृद्धीचा प्रवास रियाजामुळे होतो.आजही कवितांचे विविध प्रकार लिहीले जातात पण कविता लिहीतांना प्रत्येक कवीने कविता ही सर्वस्वी स्वतःची हवी हे लक्षात ठेवलेच पाहीजे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री साहित्यिका माधुरी माटे यांनी केले. त्या नाशिक कवी आणि अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयोजित कै. प्रा. डॉ. सुरेश मेणे स्मृती राज्यस्तरीय काव्यसंग्रह व काव्यलेखन स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित कै.मीनाताई धामणे स्मृती काव्यवाचन स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक कवीचे अध्यक्ष इंजी. बाळासाहेब मगर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्की.चंद्रकांत धामणे, आनंद ॲग्रोचे जनरल मॅनेजर विश्वजीत आहेर तसेच अब्राम संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल देशपांडे हे उपस्थित होते.याच दिवशी सकाळी झालेल्या कै. मिनाताई धामणे जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेमध्ये ११० बालकवींची सहभाग नोंदविला. संस्थेच्या उपक्रमाचे १८ वे वर्ष आहे. या वर्षीही स्पर्धेसाठी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेसाठी भारत आणि भारता बाहेरून ६७५ कविता आणि ८८ काव्यसंग्रह प्राप्त झाले होते. पुरस्कारचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून श्री. मनोहर विभांडीक, नाशिक, श्री. प्रमोद खराडे, पुणे, श्री. गिरीश जोशी, छ. सांभाजी नगर, श्रीमती ज्योस्त्ना चांदगुडे, पुणे तर काव्यवाचन स्पर्धेचे सविता पोतदार, चिदानंद फाळके, प्रांजली आफळे आणि आशा गोवर्धने यांनी काम पाहिले.या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे.*पुरस्कारार्थी*काव्यसंग्रह प्रथम -किरण भावसार (घामाचे संदर्भ ) सिन्नर द्वितीय – श्रीपाद जोशी, पुणे (शुभ्र नभाचे काठ) तृतीय- सुनिती लिमये, पुणे (दिवसांची पाने) उत्तेजनार्थ- दिनेश भोसले, चिंचवड (सूर्य आहे पेरला) *काव्यलेखन (मुक्तछंद गट)*प्रथम-संकेत पाटील, नाशिकद्वितीय- कविता झुंजारराव,मुंबई तृतीय- सुरजकुमारी गोस्वामी, हैद्राबाद,उत्तेजनार्थ- सचिन इनामदार, कोल्हापूर*वृत्तबद्ध गट* प्रथम- किरण वेताळ,पुणे द्वितीय- राहुल कुलकर्णी, धुळे तृत्तीय- रेखा हिरेमठ, सांगली उत्तेजनार्थ- देवेंद्र जोशी, यवतमाळ.*काव्यवाचन स्पर्धा**पाचवी ते सातवी गट*प्रथम- मनस्वी मतकर, डेकेअरद्वितीय-उन्नती नाकील,होली मदर स्कुल तृतीय-वैदेही पाटील, रचना विद्यालय उत्तेजनार्थ-सम्राज्ञी सूर्यवंशी, जनता विद्यालय,*आठवी ते दहावी गट*प्रथम-अनन्या दीक्षित, डे केअर द्वितीय-अनुजा कुंदलकर, आठवले जोशी शाळातृतीय -राजनंदिनी साळुंखे डे केअरउत्तेजनार्थ-मानव शिरोळे, पुरुषोत्तम स्कूल या कार्यक्रमासाठी विवेक उगलमुगले रवींद्र मालुंजकर, प्रशांत कापसे, माणिकराव गोडसे, सुशीलाताई संकलेचा, रविकांत शार्दुल तसेच नरेंद्र पाटील यांच्यासह सर्व पारितोषिक विजेते काव्यप्रेमी, साहित्यिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक सुभाष सबनीस यांनी केले तर आभार कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे यांनी मानले. सुत्रसंचलन भारती देव आणि अलका कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब गिरी, स्मिता बनकर, भारती देव यांनी प्रयत्न केले.
