
मखमलाबाद विद्यालयात कारगील विजय दिनानिमित्त सेवानिवृत्त सैनिक विद्यालयाचे उपशिक्षक पुंडलिक बडवर यांचा सत्कार करतांना प्राचार्य संजय डेर्ले,सर्व शिक्षकवृंद.*
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे “कारगील विजय दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सांस्कृतिक समिती उपप्रमुख ज्येष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.त्यांनी सांगितले की कारगिल युद्धातील भारतीय सेनेच्या धैर्याचे,शौर्याचे व दृढ निश्चयाचे स्मरण करून त्यांना वंदन करण्याचा दिवस म्हणजेच “कारगिल विजय दिवस” होय.हा दिवस देशभर साजरा केला जातो.जम्मू काश्मीरमधील कारगिल पर्वत शिखरावर पाकिस्तानी सैन्यांशी लढा देऊन सन १९९९ मध्ये भारतीय लष्कराने विजय संपन्न केला. आपल्याला आपल्या भारतीय लष्कराचा निश्चितच खूप अभिमान आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले.भारतीय लष्कराच्या सेवेत कर्तव्य बजावलेले सेवानिवृत्त सैनिक व सध्या विद्यालयात उपशिक्षक या पदावर कार्यरत असलेले पुंडलिक बडवर यांचा प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका सविता आहेर,बेबी जाधव,भाग्यशाली जाधव,प्रमोद पगार,दिपाली कोल्हे,सुनिता उशीर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका सुनीता उशीर यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
