
येवला (प्रतिनिधी)नाशिक विभागाचे शिक्षक मतदार संघाचे आदरणीय आमदार श्री किशोरभाऊ दराङे यांच्या सोबत नाशिक मुख्याध्यापक संघाच्या नवीन पदाधिकारी यांची बैठक येवला येथे संपन्न झाली .आमदार मोहदय यांनी नवीन कार्यकारणी ला शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त मुख्याध्यापक , शिक्षकांचे , शिक्षकेत्तर यांचे प्रश्न सोङवण्याच्या सुचना केल्यात आणि काही प्रश्न शिक्षक दरबारात सोङवले जातील नवीन कार्यकारणी ने सर्व समस्या लेखी देऊन संबधीत विभागप्रमुख यांच्याकङे जाऊन सोङण्यासाठी प्रयत्न करावे. यावेळी राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देखमूख सर , जिल्हा कार्याअध्यक्ष एस के सावंत सर , अध्यक्ष प्रदिप सांगळे सर , सचिव दिपक गायकवाड सर , उपाध्यक्ष योगेश पाटील यांचा व नवीन कार्यकारणी चा सत्कार आमदार किशोरभाऊ दराडे यांनी केला आणि शुभेच्छा दिल्यात यावेळी उपस्थित मुख्याध्यापक , संस्थाचालक , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी समस्या मांङल्या आमदार मोहदय यांनी बैठकीतून अधिकारी यांना फोन लावून शक्य तेवढ्या सोङवल्या मंत्रालय स्तरावरील काही. प्रश्न शासनाकङून सोङण्यासाठी लवकर बैठक लावण्यासाठी सूचना सचिवाना फोन वरुन दिल्यात . तसेच योगेश पाटील म्हणाले की,१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या २६००० कर्मचारी यांचा प्रश्न सुप्रिम कोर्टात आहे शासन सकारात्मक अस सांगितलं पण काय लेखी दिले हे आमदार मोहदय यांनी खाञी करुन महाराष्ट्रातील वंचितांना न्याय मिळवून द्यावा हीभूमिका मांङली , तसेच पवित्र पोर्टल बंद व्हावे , पेसा मुळे रोष्टर तपासणी होत नाही म्हणून भरती होत नाही तसेच सध्या साठी पवित्र भरती साठी विभाग करावे ही विनंती केली यावर आमदार मोहदय यांनी लवकरच रस्त्यावर आंदोलन करावे लागेल असे स्पष्ट केले यावेळी दिंगबर नारायणे सर , राजेद्र देवरे सर , जीवन साळुंके सर , सुनिल आहेर सर कुनगर सर इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते
