
मोहाडी : (बातमीदार) मविप्र समाज संस्थेच्या थोरात विद्यालय मोहाडी येथे विशाखा समिती महिला तक्रार निवारण समिती व सखी सावित्री समितीची स्थापना सह पालक मेळावा संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती माता व राजमाता जिजाऊ प्रतिमांचे पूजन करण्यात आले. २६ व्या कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्राचार्या सौ शरयू भामरे यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्षस्थान श्री सुरेश सोमवंशी यांनी भूषवले श्री भवर ज्ञानेश्वर यांनी प्रमुख पाहुणे मा.श्री किसनजी काळे साहेब PSI,दिंडोरी यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.ज्येष्ठ शिक्षक श्री प्रदीप जाधव यांनी मा.श्रीम.मंगला बागूल आंतरराष्ट्रीय धावपटू यांचा जीवन परिचय करून दिला. उपस्थित माता-भगिनींचा आत्मविश्वास आपल्या मनोगतातून श्री किसन जी काळे यांनी उंचावला. आपल्या यशात आई वडिलांचा वाटा किती महत्वाचा होता विद्यार्थ्यांच्या अडचणी यावर श्रीम मंगला बागुल यांनी भाष्य केलं तर मविप्र संचालक श्री प्रविण जाधव यांनीआपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळोवेळी शाळेला भेट देण्याचे माता भगिनींना आव्हान केले. उपस्थित महिलांच्या वतीने सौ रुपाली देशमुख,सौ निलम पोरजे, सौ योगिता नाठे, सौ स्वाती गोवर्धने व सौ सोनाली जाधव आपले मत मांडले विद्यालयाचा गीतमंच व दिलीप पागेरे सर यांनी नारी सन्मान गीत सादर केले. विशाखा व महिला तक्रार निवारण समितीत प्राचार्य सौ शरयू भामरे मॅडम, सरपंच सौ आशाताई लहांगे, श्री जीवन जाधव, शिवाजी नाठे, डॉ मनिषा देशमुख, सौ शुभदा देशमुख, सौ सोनाली जाधव, सौ भारती खेलूकर यांची निवड करण्यात आली. सखी सावित्री समिती मध्ये श्री सुरेश सोमवंशी , श्री सुनिल पाटील, डॉ मनिषा देशमुख, सौ शुभदा देशमुख, श्री शिवाजी नाठे, सौ भाग्यश्री जाधव, सौ सोनाली जाधव, श्रीम. सुवर्णा सोनवणे यांची निवड झाली. यानंतर नवनियुक्त कार्यकारिणीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर भवर व गोविंद बैरागी यांनी सूत्रसंचालन तर पर्यवेक्षक श्री रविंद्र निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.धनंजय जाधव व कृष्णा जाधव यांनी विशाखा, सखी सावित्री तसेच कारगिल विजय दिनाचे सुंदर असे फलकलेखन केले.
