

नांदगाव (प्रतिनिधी). आज नाशिक जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड तर्फे 26 वा कारगिल दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहात वीर नारी, वीर पिता ,वीर माता व कारगिल युद्ध प्रत्यक्ष लढलेले लढवय्ये यांचा सत्कार नाशिक आयुक्त व माननीय कलेक्टर साहेब समवेत जिल्हा परिषद सेवा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या हस्ते झाला यावर्षी हा पहिलाच कार्यक्रम सैनिक कल्याण कार्यालयातर्फे राबविण्यात आला.

.त्याचा सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे तसेच नांदगाव चे भूमिपुत्र कारगिल युद्ध श्री संजय खैरनार यांना सन्मान करण्यात आला *सैनिक कल्याण सेवाभावी* संस्थेने हा कार्यक्रम केल्याबद्दल कर्नल सोनवणे साहेब यांना संस्था कार्यध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या.

