
रावळगाव :- श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे आज दि. २५ जुलै २०२५ या रोजी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून राष्ट्रीय सेवा योजना एककाचे उदघाटन श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाने ता. बागलाण जि. नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई वाघ यांच्या हस्ते उत्सहात उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज हे उपस्थित होते, यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनंजय रौंदळ, प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास पाचंगे यांनी केले, त्यात त्यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत निकम यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज म्हणाले की, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हा देश व येथील समाज समजून घेता यावा आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून देता यावी व त्यांच्यामध्ये समाजिक कार्याची आवड निर्माण करता यावी या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना १९६९ मध्ये महत्मा गांधीचीच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने करण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेने आपल्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागून, त्यांच्यामध्ये समाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध स्वरूपाच्या कार्याची गोडी निर्माण करण्याचे कार्य केले आहे, त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अष्टपेलू वैक्तीमत्व घडविण्याचे प्रभावी मध्यम आहे. असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर, प्रा. शरद आंबेकर प्रा. अंबादास पाचंगे, प्रा. भरत आहेर, प्रा. राज ठाकरे, प्रा. कल्पेश खेरनार, प्रा. अक्षय चव्हाण, प्रा. गीतांजली खैरनार, प्रा. अदिती काळे, प्रा. कावेरी जाधव, प्रा. मोहिनी आहेर, प्रा. सोनं पाटील, प्रा. चेतना हिरे, प्रा. देवयानी निकम, प्रा. आकांश शेलार, प्रा. शिवानी शेवाळे, यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.छायाचित्र १) वृक्षारोपण करताना संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज यांच्या समवेत महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी.छायाचित्र २) कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज, यांच्या समवेत (डावीकडून) रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास पाचंगे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई वाघ.
