
सिन्नर (प्रतिनिधी).*आज 26 जुलै 2025 रोजी सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले विद्या मंदिरात शिक्षक आणि पालक यांच्यात शाळा स्तरावरील विविध समित्यांच्या पदनियुक्तीसाठी शिक्षक पालक ,संस्थेतील आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते.सभेची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान प्राथमिक विभागाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.मंगल झगडे यांनी भूषविले. सभेचे प्रास्ताविक करत असतांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता राजगुरु यांनी समित्यांबाबतचे शासनाचे ध्येयधोरणे उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच शासनाने विद्यार्थी हितासाठी आणि शालेय वेळेची बचत व्हावी म्हणून कोण कोणत्या समित्यांचे एकत्रित गठन केलेले आहे हेही प्रतिपादित केले.विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत काही सूचना असेल मुख्याध्यापक,शिक्षक यांच्या बाबत काही तक्रार असेल तर तक्रार पेटीचाही वापर करून तक्रार करू शकतात याची माहिती दिली.शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.विजय लोणारे शाळेचे माजी विद्यार्थी असून आज वैद्यकीय क्षेत्रातील समितीतील सहभाग ही अभिमानाची गोष्ट आहे.समितीच्या कार्याची माहिती दिली.तदनंतर श्री. बाळू माळी यांनी शालेय व्यवस्थापन समितीतील पदभार स्विकारण्यासाठी पालकांना आवाहन केले. सर्व पालकांनी योग्य प्रतिसाद देऊन स्व-नियुक्ती साठी उत्सुकता दर्शविली.शालेय व्यवस्थापन समितीचे गठन झाल्यानंतर समितीतील सर्व सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर श्रीमती. रोहिणी मिठे यांनी शाळा स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक सुविधा विकसन समितीच्या पदनियुक्तीसाठी आवाहन केले. या समितीत सहभागी होण्यासाठी डॉ. विजय लोणारे, श्री.पंकज बलक आवर्जून उपस्थित होते. पुढील काळात कोणत्याही आरोग्य विषयक कार्यासाठी शाळेला सहकार्य करण्याची सहमती डॉ.विजय लोणारे यांनी दर्शवली. तसेच पंकज बलक यांनीही केव्हाही आवाज द्या आम्ही तयार आहोत असे प्रतिपादित केले या समितीत आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका,आशा सेविका, वकील, माजी विद्यार्थी तसेच पालकांमधील सदस्य यांची देखील नियुक्ती करण्यात आली.सर्व पदनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सभेच्या अध्यक्षा मंगलाताई झगडे यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले व पुढील कालावधीत आपण शाळेस सहकार्य कराल अशी आशा व्यक्त केली.त्यानंतर पालकांनी केलेल्या सूचनांचे निरसन करण्यात आले. सभेसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे पालकांचे व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचे आभार श्री. अरविंद लोणारे यांनी मानले. अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक असणाऱ्या समित्यांच्या पदनियुक्त्या करण्यात आल्या.
