
नाशिक, २६ जुलै – श्रीमान टी.जे. चौहान( बिटको )हायस्कूल,मोरवाडी, नाशिक विद्यालयात आज कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. माळी मॅडम,पर्यवेक्षक श्री. गहाणकरी सर तसेच प्रमुख अतिथी माजी सैनिक श्री विठ्ठल सिंग राजपूत सर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांना भारतीय सैनिकांनी कारगिल वर कसा विजय मिळवला यावर आधारित एक छोटासा व्हिडिओ दाखवण्यात आला.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी राख्या सुद्धा बनवल्या.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक श्री. विठ्ठल सिंग राजपूत उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात युद्धातील अनुभव सांगून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयत्ता सातवीच्या वर्ग शिक्षकांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी ‘जय हिंद, वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. संपूर्ण शाळा देशभक्तीच्या रंगात रंगली होती. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना दृढ करण्याचा प्रयत्न शाळेने यशस्वीपणे केला.–
