
नांदगाव (प्रतिनिधी )नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या स्वखर्चातून ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथील दंतचिकित्सा विभागाकरिता डेंटल चेअर भेट देण्यात आली. व दंतचिकित्सा विभागाचे लोकार्पण करण्यात आले.ग्रामीण रुग्णालय, नांदगाव येथे आज दंत तपासणी विभाग व नवीन डेंटल चेअर चे सामाजिक कार्यकर्त्या व समृद्धी बँकेच्या चेअरमन अंजुमताई कांदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले..

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.काजल साळुंखे, डॉ.शशांक तुसे दंत शल्य चिकित्सक डॉ. निष्मा आडे – मेघावत, डॉ.राहुल राजपूत, रुग्ण कल्याण समिती सदस्य संदीप जेजुरकर आदी उपस्थित होते…या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलतांना सौ.कांदे म्हणाल्या की, ग्रामीण रुग्णालयामध्ये नवीन ‘डेंटल चेअर’ स्थापन करून दंतचिकित्सेच्या सेवेला नवे परिमाण मिळणार आहे. या सुविधेचा ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.गेल्या काही काळापासून आपल्या रुग्णालयात दंतोपचार विभाग कार्यरत असला तरी अत्याधुनिक साधनांच्या अभावामुळे काही मर्यादा होत्या. त्या मर्यादा आता नव्या डेंटल चेअरमुळे दूर होतील,

रुग्णांना या नवीन डेंटल चेअरच्या निमित्ताने अधिक चांगल्या व सुसज्ज सुविधा देता येतील.भविष्यात आणखी आधुनिक वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असेही त्या म्हणाल्या..दंत विभाग व इतर आरोग्याच्या प्रश्नावर देखील सौ.कांदे यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले..रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या आ.सुहास कांदे यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या अंजुम कांदे यांनी स्वखर्चातून ग्रामीण रुग्णालयाला ही डेंटल चेअर भेट दिली.. त्यांच्या पुढाकारामुळे आणि सकारात्मक दृष्टीकोनामुळेच आज आपण ही सुविधा लोकांसाठी खुली करत आहोत.त्या बद्दल आम्ही संपूर्ण ग्रामीण रुग्णालय परिवार त्यांच्या ऋणी आहोत असे आपल्या प्रास्ताविकात वैद्यकीय अधीक्षक डॉ.काजल साळुंखे यांनी सांगितले.

.तर दंत शल्य चिकित्सक या पदाच्या जबाबदारी बरोबर दररोज अधिकाधिक रुग्णांपर्यंत या सुविधेचा लाभ पोहोचविण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू असे दंतशल्य चिकित्सक डॉ. निष्मा आडे – मेघावत यांनी आभार प्रदर्शनातून सांगितले..या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
