
खडकेद (ता. इगतपुरी) येथील आदिवासी आश्रम शाळेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड करतांना जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, माजी आमदार शिवराम झोले, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे मा जी पं सदस्य बाळासाहेब गाढवे आदी.
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन- इगतपुरी तालुक्यातील खडकेद येथील आदिवासी विद्या प्रसारक समाज घोटी बुद्रुक शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नाशिक जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, माजी आमदार शिवराम झोले, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, बाळासाहेब गाढवे, इगतपुरी तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, संतोष भोसले, सोशल मीडिया प्रमुख किरण मुसळे, गटप्रमुख वसंत भोसले, सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, दूंदा जोशी, मुख्याध्यापक सुरेश निगळे, संतु भालेराव, तुषार देवरे, योगेश नाठे, संजय काळे, भरत वाघ, पंढरीनाथ धोंगडे, ईश्वर बच्छाव,विठ्ठल खतेले, राजेश मोहिते,भाऊराव रोंगटे, अधिक्षिका शुभांगी पाटील, प्रवीण धादवड, गोरख जाधव, उल्हास वाघ, वर्षा नाथ, नंदा अकोटकर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक भाऊराव रोंगटे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुरेश निगळे यांनी मानले. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इगतपुरीचे आ. हिरामण खोसकर यांच्या सहकार्यातून तालुक्यात १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या सप्तहात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यातआली तसेच अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी मार्गदर्शन उपचार शिबीर, रक्तदान शिबीर, महिला बचत गट यांना सुरक्षितता, आरोग्य, रोजगार, शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम,शेतकऱ्यांना पीक विमा, शासकीय योजना बाबत प्रसिद्धी करण्यात आली गाव तिथे वृक्ष रोपण, रुग्णालय मध्ये फळे वाटप आदी कार्यक्रम करण्यात आले व सप्ताह मध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी सांगितले
