
सारताळे (प्रतिनिधी)–पर्यावरण रक्षणार्थ धरा वृक्षारोपणाचा ध्यास. समाज सेविका अंजुम ताई कांदे.एक पेड माँ के नाम मा.पंतप्रधान यांच्या महत्वाकांशी उपक्रमांतर्गत आश्रम शाळा, सारताळे येथे वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी समाज सेविका अंजुम ताई कांदे यांनी पर्यावरणच महत्व कथन करीत उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना आईचे नावे एक झाड लावीत पर्यावरणाच्या संतुलनार्थ वृक्षारोपणाचा ध्यास घेण्याचे आव्हान केले. सदर कार्यक्रम प्रसंगी माईताई कातकडे, रोहिणी मोरे,नांदगाव, संगीता बागुल माजी नगराध्यक्षा मनमाड, संस्था अध्यक्ष दर्शन दादा पगार, वनरक्षक एन. डी. चौधरी , कोशाध्यक्षा नम्रता पगार व रचना दीदी इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रम समारोप प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष संस्था सरचिटणीस रमेश अप्पासाहेब पगार यांनी उपस्थितांना धन्यवाद दिले संस्था वाटचालीचा आराखडा व भावी वाटचाली बद्दल मत मांडले आश्रम शाळेच्या मुलांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी माळ रानावर वनराई फुलवण्याचा संकल्प केला. सदर कार्यक्रम सुत्रसंचालन डी. पी. सुर्यवंशी यांनी केले तर प्रास्ताविक आश्रमशाळा प्राचार्य समाधान चौधरी यांनी मांडले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम समारोप झाला. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, महिला शिक्षिका, अधिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.
