
साकोरे (ता. नांदगाव) | रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकोरे येथे शासन उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींसाठी “सक्षम तू” हा भविष्यवेधक व प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम दि. २३/७/२०२५___ रोजी उत्साहात पार पडला.कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपजिल्हाध्यक्ष मा. श्रीमती योगिता ताई पाटील, तालुका अध्यक्ष श्रीमती अपर्णाताई देशमुख तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती इंगळे मॅडम (नांदगाव) यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींना आत्मविश्वास, स्वाभिमान, आणि उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांनी ‘सक्षम स्त्री’ या संकल्पनेवर आधारित प्रभावी विचार मांडले

.या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य व स्कूल कमिटी अध्यक्ष आदरणीय रमू काका बोरसे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थिनींना जीवनातील प्रत्येक संघर्षाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आत्मबळ वाढवण्याचा संदेश दिला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या आदरणीय माझी प्राचार्या श्रीमती जगताप मॅडम व नवनियुक्त प्राचार्य आदरणीय श्री झाल्टे सर यांनी भूषवले. त्यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत जीवनात योग्य दिशा मिळविण्याचे महत्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. श्रीमती गायत्री पाटील मॅडम यांनी सहजतेने पार पाडले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार विद्यालयातील श्रीमती खैरनार मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन उपशिक्षिका श्रीमती एस. बी. बोरसे मॅडम यांनी केले.कार्यक्रमात विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. हसत-खेळत, प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे व विद्यालयाचे विशेष कौतुक केले.
