
विधिमंडळाच्या कामकाजा दरम्यान आमदारांचे अर्थात लोकप्रतिनिधींचे वर्तन हा चिंतेचा विषय आहे.सभागृह मग ते राज्य विधिमंडळाचे असो की संसदेचे सदस्यांचे वर्तन व कृती संसदीय प्रक्रियेला अनुसरून असावी..विधिमंडळाच्या कामकाजाचे नियम ठरलेले आहे.मात्र विधिमंडळ सदस्य सभागृहात गोंधळ घालतात.या गोंधळात वेळ वाया जात असतो.विधिमंडळाच्या कामकाजादरन्यान कोट्यवधी रुपये खर्ज होत असतो..दुसरी बाब सभागृहात चर्चा सुरू असताना सभासद आपसात बोलतात,मध्येच बोलतात..काही सदस्य तर चक्क सोशल मीडियाचा वापर सभागृहात करतात..मागे काही सदस्यांनी सभागृत अश्लील चित्रफित बघत असल्याची देखील बातमी समोर आली होती..कर्नाटक विधानसभा अधिवेशनादरम्यान अश्लील चित्रफीत पाहिल्याप्रकरणी मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते.नुकत्या संपलेल्या राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात आमदार कोकाटे मोबाईलवर चक्क गेम खेळत होते.सभागृहात गेम खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला.अधिवेशनाच्या वेळेला सभागृहात मंत्री कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केला आहे त्यामुळे एकीकडे शेती कर्जमाफीच्या वाद्यावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसली गेली असताना सभागृहात कृषीमंत्र्यांनी पत्त्यांचा डाव मांडल्यावरून संताप व्यक्त होतोय. मात्र आपण पत्त्यांचा गेम खेळत नसल्याचा दावा कोकाटेंनी केलाय पण त्यांचं स्पष्टीकरण इतकं गुंतागुंतीचं आहे की जणू नेमकं ते करत काय होते याबद्दल स्वतः कोकाटे संभ्रमात दिसताय. कोकाटे आधी म्हणतात की युट्यूब वरचा व्हिडिओ बघताना पत्त्याच्या गेमची जाहिरात आली होती मी फक्त ती जाहिरात स्किप करत होतो. कोकाटेंचा दुसरा दावा आहे की मोबाईलमध्ये डाऊनलोड झालेला गेम मी स्किप करत होतो तेव्हाच व्हिडिओ काढला गेला. पुन्हा कोकाटे म्हणतात की लोकांना युट्यूबवर जंगली रमीच्या जाहिराती येत नाहीत का त्यात गैर काय? कोकाटेंचं चौथं स्पष्टीकरण आहे की कोणीतरी माझ्या मोबाईलमध्ये पत्त्यांचा गेम डाऊनलोड केला असावा तोच युट्यूबमध्ये सुरू झाल्याने मी बंद करत होतो.विधी सदस्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून अन् कृतीतून समाजासमोर आदर्श उभा केला पाहिजे ते लोकप्रतिनिधी असे वागत असतील तर मग सामान्यांनी अपेक्षा कुणाकडून ठेवायची अशी चर्चा आता होत आहे. बरं लोकप्रतिनिधींचे वर्तन कसे असावे यावर विधानसभेचे एक पुस्तकच आहे. हे पुस्तकच या लोकप्रतिनिधींनी वाचले नसेल असे पावसाळी घटनेवरून वाटत आहे. त्यामुळे या पुस्तकातील काही महत्त्वाचे नियम आणि बाबी जनतेसमोर ठेवल्या आहेत.आता हे नियम तुम्हीच वाचा अन् ठरवा यातील किती नियम लोकप्रतिनिधी पाळतात ते…विधिमंडळाची प्रतिष्ठा जपण्यासह विधिमंडळाच्या कार्यशीलतेची हमी देण्यासाठी सदस्यांचे वर्तन अतिशय महत्त्वाचे असून त्यांनी शिष्टाचार आणि वर्तनाच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे असे यात स्पष्ट म्हटले आहे.या आचारसंहितेत सदस्यांच्या वर्तनाविषयी विस्तृत, सखोल माहिती देण्यात आली आहे. या नियमावलीपैकी महत्त्वाच्या नियमांवर एक नजर टाकूया…साधारण नियमसदस्यांनी सभागृह सुरू होण्यापूर्वी आपल्या आसनावर बसावे. पीठासीन अधिकारी म्हणजेच सभापती किंवा अध्यक्ष सभागृहात आल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून त्यांना अभिवादन करावे.सदस्यांनी सभागृहात उपस्थित असताना सभागृहातील कामकावरच लक्ष केंद्रित करावे. सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित नसलेले वृत्तपत्र वाचण्यास मनाई आहे.सदस्यांनी सभागृहात शांतता पाळावी तसेच आपापसात विनोद करणे टाळावे. आपसांत बोलू नये. शक्य तितक्या हळू आवाजात बोलावे.सदस्यांनी एकमेकांवर ओरडू नये, सभागृहात घोषणा देणे संसदीय सभ्याचाराशी सुसंगत नाही.सभागृहात घोरणे निषिद्ध आहे.दुसऱ्या सदस्याचे भाषण सुरू असताना सभागृहात भाषण करणाऱ्या सदस्याने अनुमती दिल्याखेरीज व्यत्यय आणण्याचा सदस्याला हक्क नाही.वर्तन आचारसंहितेचे स्वतंत्र पुस्तक विधिमंडळ सदस्यांच्या वर्तणुकीसंदर्भात संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचाराच्या आचारसंहितेची स्वतंत्र पुस्तिकाच आहे. यात सदस्यांचे वर्तन कसे असायला हवे याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.विधिमंडळाची प्रतिष्ठा राखावी विधिमंडळाची प्रतिष्ठा जपण्यासह विधिमंडळाच्या कार्यशीलतेची हमी देण्यासाठी सदस्यांचे वर्तन अतिशय महत्त्वाचे असून त्यांनी शिष्टाचार आणि वर्तनाच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे असे यात स्पष्ट म्हटले आहे.साधारण नियमसदस्यांनी सभागृह सुरू होण्यापूर्वी आपल्या आसनावर बसावे. पीठासीन अधिकारी म्हणजेच सभापती किंवा अध्यक्ष सभागृहात आल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून त्यांना अभिवादन करावे.सदस्यांनी सभागृहात उपस्थित असताना सभागृहातील कामकावरच लक्ष केंद्रित करावे. सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित नसलेले वृत्तपत्र वाचण्यास मनाई आहे.सदस्यांनी सभागृहात शांतता पाळावी तसेच आपापसात विनोद करणे टाळावे. आपसांत बोलू नये. शक्य तितक्या हळू आवाजात बोलावे.सदस्यांनी एकमेकांवर ओरडू नये, सभागृहात घोषणा देणे संसदीय सभ्याचाराशी सुसंगत नाही.सभागृहात घोरणे निषिद्ध आहे.दुसऱ्या सदस्याचे भाषण सुरू असताना सभागृहात भाषण करणाऱ्या सदस्याने अनुमती दिल्याखेरीज व्यत्यय आणण्याचा सदस्याला हक्क नाही. बेशिस्त वर्तणूक:अध्यक्षांच्या आसनाजवळ जाणे, त्यांचा माईक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये.सभागृहातील बाकावर उभे राहण्यास मनाई आहे. एकाच वेळी दोन सदस्यांनी बोलण्यास उभे राहू नये.सभागृहाच्या बाहेरील लॉबीत असताना आपला हसण्याचा अथवा बोलण्याचा आवाज सभागृहात ऐकायला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.एखाद्या सदस्याने आपले पादत्राण हातात घेऊन दुसऱ्या सदस्यास धमकावणे हे अतिशय आक्षेपार्ह वर्तन आहे.सदस्यांना सभागृहात धुम्रपान करणे, हॅट, ओव्हरकोट घालणे यास मनाई आहे.सभागृहाच्या कार्यवाहीदरम्यान सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांविषयी योग्य आदर दाखविला पाहिजे. त्यांच्या आसनाच्या दिशेने पाठ करून उभे अथवा बसून राहू नये.पीठासीन अधिकारी बोलण्यासाठी उभे असताना सदस्यांनी सभागृहात इकडून तिकडे जाऊ नये, फिरू नये, उभे राहू नये किंवा सभागृहात प्रवेश करू नये किंवा सभागृह सोडून जाऊ नये.सदस्यांनी पोठासीन अधिकारी यांच्या आसनासमोरून किंवा सभागृहाच्या एका बाजूकडून दुसरीकडे जाऊ नये.सभागृहात भाषण करताना ते नेहमी पीठासीन अधिकारी यांना उद्देशून असावे. कोणाही व्यक्तिगत सदस्याला उद्देशून नसावे.पीठासीन अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयावर सभागृहात वा सभागृहाबाहेर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टीका करू नये.सभागृहाची प्रतिष्ठा:सदस्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा जपावी.एखादी हरकत नोंदविताना सभागृहात कागदपत्रे फाडू नयेत.सदस्यांनी सभागृहात काठी आणू नये.सभागृहात शस्त्र बाळगण्यावर प्रतिबंध आहे.सदस्यांनी सभागृहात खाद्यपदार्थ आणू नयेत.सदस्याने सदस्यांचा बिल्ल्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा बिल्ला (बॅज) लावू नये, घोषणा चिन्ह किंवा घोषवाक्य लावू नये.सभागृहातील आपल्या आसनावर सदस्यांनी झेंडा किंवा चिन्ह मांडू नये.सदस्यांनी सभागृहात जाहिरात असलेला पोषाख परिधान करू नये.कोणत्याही सदस्याने सभागृहात धरणे धरू नये आणि सभागृहाच्या हौद्यात घोषणाबाजी करू नये.इतर नियमसदस्यांनी, इतर सदस्यांवर दोषारोप ठेऊ नये.सदस्याने, सभागृहात उपस्थित सदस्यांना संबोधून बोलू नये, त्याने केवळ अध्यक्ष/सभापतींना संबोधून बोलावे आणि सभापती/अध्यक्ष यांच्या माध्यमातूनच इतर सदस्यांच्या बाबतीत भाष्य करावे.कोणत्याही सदस्याने असंसदीय भाषेचा बापर केल्यावर लवकरात लवकर अशा भाषेकडे सभापती/ अध्यक्ष यांचे लक्ष वेधावे.सभापती/ अध्यक्षांनी असा शब्द किंवा शब्दप्रयोग असंसदीय असल्याचा निर्णय दिल्यानंतर ते मागे घ्यावे.सदस्यांनी उच्च न्यायालयाच्या संदर्भात योग्य तो शब्दप्रयोग करावा.सदस्यांनी उच्च न्यायालयाबाबत किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वर्तनाबाबत सभागृहात चर्चा करू नये.भाषणाविषयी नियम:पीठासीन अधिकाऱ्याने लक्ष वेधून घेतल्याशिवाय आणि त्यांनी नावाने किंवा खूण करून बोलण्यास सांगितल्याशिवाय सदस्यांनी बोलू नये.पीठासीन अधिकारी केवळ काही शारीरिकदृष्ट्या असमर्थ असलेल्या सदस्यास खाली बसून बोलण्याची अनुमती देऊ शकतील.सदस्यांनी नेहमी तृतीय पुरुषी संबोधने वापरावीत व व्यक्तिगत संदर्भ देणे टाळावे तसेच सभ्य भाषेचा वापर करावा.भाषणादरम्यान काव्याच्या काही ओळी वाचता येतील परंतु संपूर्ण भाषण काव्यातून करता येणार नाही.सदस्यांना सभागृहामध्ये निनावी पत्रे वाचून दाखविता येणार नाहीत. माहितीसाठी आधार घेतलेल्या प्राधिकरणाचे नाव उघड करावे लागेल किंवा प्राप्त माहिती आपल्या स्वतःच्या शब्दात मांडावी लागेल.भाषणादरम्यान वस्तू वा कागदपत्रांचे प्रदर्शन वा त्यांचे सभागृहाच्या पटलावर सादरीकरण करता येणार नाही.सभागृहात वस्तू प्रदर्शित करण्याविषयीकाही वस्तू प्रदशित करावयाच्या असल्यास सदस्यांस त्या सभागृहास केवळ दाखविता येतील परंतु त्या सभागृहाच्या पटलावर ठेवता येणार नाहीत.कागदपत्रे फाडणे वा त्यांस आग लावणे आदि कृत्ये सभागृहात निषिद्ध आहेत.टीका करतानासदस्यांनी शासनावर टीका करताना चर्चेची पातळी राखावी आणि इतर सदस्यांनी सभ्याचार सोडून केलेल्या शब्दप्रयोगांबद्दल आपली नापसंती दर्शवावी.चर्चेदरम्यान, राजदूत, इतर सभागृह किंवा इतर विधानमंडळाचे सदस्य किंवा सभागृहात उपस्थित नसलेल्या व्यक्तींवर टीका करू नये.सदस्यांनी, सभागृहात उपस्थित नसलेल्या व उत्तरादाखल आरोपांचे खंडन करू न शकणाऱ्या व्यक्तींची नावे अथवा त्यांच्या पदनामांचा संदर्भ देऊ नये. सभागृहास उत्तरदायी असेल अशा प्रभारी मंत्र्यांना उद्देशून टीका असावी.आरोपांचे खंडन करण्यासाठी सभागृहात उपस्थित नसतील अशा व्यक्तीविरूद्ध आरोप करण्यास अनुमती नसेल.९५६१५९४३०६
