
(ज्ञानेश पिसे यांच्या लेखणीतून..)
नांदगाव- मा.राजेशजी कवडे ( बबिकाका) यांच्या नेतृत्वात यंदा 21 व्या वेळीहिंदू धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या बाबा अमरनाथाचे दर्शन घेण्याचा लाभ शेकडो नांदगावकरांनी घेतला. अमरनाथ यात्रेला गेलेले तब्बल 200 भाविक परतीच्या मार्गांवर आहेत. गेल्या 21 वर्षांपासून शिवभक्त बबीकाका यांच्या समवेत अनेक पिढ्यांना अमरनाथ यात्रेचा लाभ झाला आहे.धर्मविराची एकवीस वर्ष भक्ती भावाची आहेत. हिंदू धर्मात एकवीस या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्णता व संतुलनाचे प्रतीक मानले गेलेली 21 ही संख्या विविध धार्मिक विधीमध्ये अत्यंत मानाची मानली गेलेली आहे.धर्मरक्षणाची शिकवण आणि कर्म, कर्तव्य व निष्ठा यांच्या रक्षणाची महिती गायली असल्याने 21 या संख्येला धार्मिक महत्व आहे. नांदगाव पंचक्रोशीतून गेल्या एकवीस वर्षांपासून शिवपुराणात कठीण मानल्या जाणाऱ्या बाबा बर्फानी.. अमरनाथ यात्रेला राजेश कवडे यांच्या नेतृत्वात शेकडो लोक जाता आहेत.हा केवळ योगायोग मानावा की शुभ वर्तमान. काही संकेत हे दैवी असतात.राजकारण आणि भक्ती यांची रसमिसळ होऊ शकत नाही पण सत्तेचा राजमार्ग हा भक्तीच्याच रहस्यमयी गुफेतून जातो हे वास्तव तुम्ही आम्ही टाळू शकत नाही.भक्ती भावाचा अनोखा संगम या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून घडत आला आहे.शिवभक्ती ही काहीशी कठीण समजली जाते पण यातून जो तारून नेतो आणि हा दुर्लभ योग घडवून आणतो तो निश्चितच वंदनीय आहे.राजेश कवडे हे नांदगाव नगरीचे प्रथम नागरिक अविरत ही सेवा बजावत आहे.शिवभक्तीचा हा सुगंध नादगांवच्या काना कोपऱ्यात पोहचला आहे .पूर्वी अतिशय दुर्गम भागातून जाणारा हा मार्ग फार खडतर होता.सुविधांची वाणवा आणि निसर्गाचा काही भरवसा नाही अशी प्रतिकूल परिस्थिती या काळात अमरनाथ यात्रेला जाण्याचे धाडस कुणी करत नसत या काळात काकांनी ही यात्रा सुरु केली कोविड काळ वगळता आज पर्यन्त अविरत हा प्रवास चालू राहिला आहे.काही वर्षांपूर्वी दहशतवादी हमल्याच्या धमकीने अवघे अध्यात्म हादरून गेले असतांना देखील ही यात्रा सतत चालू राहिली आता या वर्षी आलेल्या संवेदनशील बातमी मुळे सगळे आप्त स्वकीय चिंतेत असतांना तब्बल 200 नांदगावकर सुरक्षित असल्याची ग्वाही काकांनी दिलीय.चांगुलपणाच्या पाऊलखुणा उमटवत हा प्रवास सुखरूप चालू आहे.ज्या प्रमाणे भोलेबाबांच्या दर्शनासाठी एक एक पर्वत शिखर सर करीत कष्टप्रद परिस्थितीत अनेक भाविक जाता आहेत त्याच प्रमाणे राजकारण,समाजकारण आणि जन सेवा यात देखील एक एक शिखर पार करीत त्यांची प्रगती चालू आहे.भक्ती आणि सत्तेचा अनाकलनिय प्राचीन संबध असला तरी या दोन ही ठिकाणी समर्पित भावनेने स्वतःला सिद्ध करावे लागतेसतत अविरत चालणाऱ्या या भक्ती यज्ञास मनपूर्वक शुभेच्छा .धर्मरक्षणाचे कार्य असेच तुम्हा हातून घडत राहो हिच या धर्मवीरासाठी शुभकामना ! बाबा अमरनाथ यात्रे सोबतच नांदगावची भक्ती परंपरा समृद्ध होत आहे.नांदगाव पंचक्रोशीतील अनेक तरुण भक्ती भावाने चिंब होत प्रभू परमात्याचे गुण गाण करीत आहेत.आध्यात्मापासून ओढावत जाऊन मोबाईल सारख्या आभासी जगात जगणाऱ्या आजच्या पिढीसाठी नक्कीच हे कार्य कौतुकास्पद आहे.मंदिरे ही आपली शक्तिस्थाने आहेत.मंदिराच्या गाभऱ्यातून अनेक सकारात्मक विचार बाहेर पडून अखंड ही विचारज्योत समाजाला तेजोमय करित असते.मंदिर उभारणे मन्हजे एक नव्हे अनेक पिढी उभारणे.मंदिर ही अशी व्यवस्था आहे ज्या मध्ये कल्याणाचा मुलमंत्र लपलेला आहे.काही वर्षांपूर्वी अमरनाथ मंदिराचे स्थान महात्म्य काही जुन्या जाणत्या मोजक्या लोकांना माहीत होते पण आता अमरनाथ पूजा बघण्यासाठी, यात्रेसाठी आणि भोलेबाबाचे दर्शन घेण्यासाठी जमलेला जन समुदाय बघता शिवाच्या साक्षीने किती बदललेले आहे याची जाणीव झाली हा बदल आश्वासक आहे.भक्तीची ही परंपरा एका पिढी कडून दुसऱ्या पिढी कडे आपसूकच चालत आली आहे.नांदगावचे अध्यात्म असे तरुण हातून फुलतांना येणारा काळ नक्कीच चांगले बदल घडून आणेल यात शंका नाही.भोले बाबाची पवित्र आणि शुद्ध हेतू असणारी भक्ती व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते.माझे सहकारी शिवभक्ती मनामनात रुजवण्याचे कार्य करित आहेत.मित्रहो ..अनेक पिढी संस्कारक्षम करण्याची जबाबदारी तुमच्या समर्थ खांद्यावर आहे ती तुम्ही शिवाच्या साथीने नक्की पेलाल हा मला विश्वास आहे.नांदगाव मध्ये शिवभक्क्तीचा, अध्यात्माचा उल्लेख होईल तेव्हा बबी काका व त्यांचे सहकारी यांचा गौरव होईल.
