
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९७६ वा दिवस*
सत्य हे असत्याहून अनंतपटीने प्रभावशाली आहे, चांगुलपणा हा वाईटपणाहून अनंतपटीने प्रभावशाली आहे. जर सत्य व चांगुलपणा ही दोन्ही तुमच्या ठायी असतील तर ती केवळ आपल्या प्रभावानेच आपला मार्ग तयार करुन घेतील. आपल्या ठायी सत्याचे अधिष्ठान असावे. सत्याचे अनुसरण करा मग ते तुम्हाला कुठेही घेऊन जावो; प्रत्येक विचार हा त्यातून निघणाऱ्या अंतिम तर्कसंगत निष्कर्षाप्रत पोहोचू घ्या. भित्रे व दांभिक बनू नका. अंतिम विजय सत्याचाच होता यावर पूर्ण विश्वास ठेवा.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर २ श्रावण शके १९४७*
★ आषाढ अमावस्या
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २४ जुलै २०२५
★ गतहारी /दिवटी अमावस्या
★ दीप पूजन…
★ गुरुपुष्यामृतयोग
★ १९११ हैदराबाद मुक्ती संग्रामातील झुंजार स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्राॅफ यांचा जन्मदिन.
