
मनमाड ( प्रतिनिधी). मनमाड नगरपरिषद हद्दीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण बांधकामाचे नियमन करण्यासंदर्भात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी महाराष्ट्र राज्याची महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यासोबत यशस्वी बैठक पार पडली.

यामध्ये घेण्यात आलेले मुद्दे
1) मनमाड नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या झोपडपट्ट्यामधील अतिक्रमण धारकांसाठी 2.0 मधील घरकुल बांधण्यासाठी त्यांच्या ताब्यात असलेली 15 चौरस फूट च्या आतील भूखंड त्यांच्या नावावर करण्यात यावे.जेणेकरून त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येईल व जागाही नावावर होईल. लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
2) मनमाड नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या IUDP भागातील नागरिकांची घरे जवळपास 35 वर्ष पूर्वीचे भूखंड धारकांना भूखंड दिलेले आहेत. 2006 साली महसूल कडून भूखंड वर्ग 2 लावून उतारे तयार करण्यात आले होते. यावेळी विविध अटी शर्ती घालण्यात आलेल्या होत्या, आणि म्हणून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, शिवाय त्यांच्या अडचणींमध्ये सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी शिवाय हस्तांतरण करणे शक्य नव्हते. पण आता शासनाच्या नियमाप्रमाणे येणारा नजराणा भरल्यानंतर सदर भूखंड हा (freehold) नावावर होऊन 7/12 करण्यात याव्या अशा सूचना वजा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
3) नगरपालिका हद्दीतील हुडको मार्फत ५५३ लोकांना घरी दिलेली आहेत, 7/12 व त्यांची नावे नसल्याने त्यांना विविध शासकीय कामांकरिता परवानगीसाठी म्हाडाकडे जावे लागते, म्हणून त्यांच्या सातबारा वर नाव लावण्या करिता लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

.या विविध विषयांवर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सतत केलेल्या पाठपुरावा केला. आजच्या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे साहेब, डीपीओ शाम गोसावी साहेब, म्हाडाचे मुख्याधिकारी तसेच मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी साहेब उपस्थित होते. नगरपरिषद हद्दीतील हुडको मार्फत मनमाड शहरात 553 लोकांना 40 ते 45 वर्षांपूर्वी भूखंड व साधने का वितरित करण्यात आल्या होत्या त्यावेळेस त्यांना फक्त देण्यात आले होते सातबारावर त्यांचे नाव नव्हते यामुळे त्यांना विविध अडचणी येत होत्या यावेळी सन्माननीय मंत्री महोदयांनी पुढील लवकरात लवकर सर्व विषय मार्गी लावण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या घराच्या समस्या सुटणार आहेत. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर मनमाडकर सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रश्न मिटणार आहे. या बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, नगरसेवक महेंद्र शिरसाट आदी उपस्थित होते
