
नांदगाव ( प्रतिनिधी ) नांदगाव शहरातील रेल्वे गेट येथील लक्ष्मी माता यात्रा उत्सवकाल संपन्न झाला. याप्रसंगी सौ अंजुमताई सुहास कांदे यांनी उपस्थित राहून मनोभावे देवीची ओटी भरण पूजा केली व यात्रोत्सवात सहभाग नोंदवला.

तसेच या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या सर्व प्रतिनिधी पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली.यावेळी लक्ष्मी माता यात्रा उत्सव समितीच्या वतीने सौ. अंजुम ताई कांदे यांचे स्वागत व सत्कार विद्या कसबे, नेहा कोळगे, वंदना पांडे, जया जगताप, विजया चतुर, कल्पना सुरवाडे , संगीता जगताप व किरण फुलारे यांनी केला.


