
मनमाड ( प्रतिनिधी). आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरातील विविध भागातील अतिक्रमण क्षेत्रातील कुटुंबीयांकरीता आनंदाची बातमी आहे.मनमाड नगरपरिषद हद्दीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण बांधकामाचे नियमन करण्यासंदर्भात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी महाराष्ट्र राज्याची महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यासोबत यशस्वी बैठक पार पडली. यामध्ये घेण्यात आलेले मुद्दे मनमाड नगर परिषदेच्या अंतर्गत येणारे अतिक्रमित घरकुलांना नियमित करणे व भाडेपट्ट्याने जमिनी नावावर करण्यात यावे.

मनमाड नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या IUDP भागातील नागरिकांची घरी त्यांच्या नावावर करण्यात यावे. नगरपालिका हद्दीतील हुडकवाअंतर्गत चे घरकुले नावावर करण्यात यावे. या विविध विषयांवर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सतत केलेल्या पाठपुरावा केला. आजच्या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे साहेब, डीपीओ शाम गोसावी साहेब, म्हाडाचे मुख्याधिकारी तसेच मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी साहेब उपस्थित होते. यावेळी सन्माननीय मंत्री महोदयांनी पुढील पंधरा दिवसात सर्व विषय मार्गी लावण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या घराच्या समस्या सुटणार आहेत. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर मनमाडकर सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रश्न मिटणार आहे.

या बैठकीस माजी नगराध्यक्ष योगेश पाटील शिवसेना तालुकाप्रमुख तसेच नगरसेवक साईनाथ गिडगे पिंटूभाऊ शिरसाट शिवसेना मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे आदी उपस्थित होते
