
नाशिक (प्रतिनिधी )|मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे हे होते.व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.इयत्ता दहावी ई चे विद्यार्थी ओजस्विनी जाधव, प्रांजल बागल,काव्या गांगुर्डे, अक्षरा भवर,अनुश्री भदाणे, वेदांत शेजवळ, वेदांत पाटील,अर्णव आहेर यांनी नाटीकाच्या माध्यमातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.त्यांच्या जीवनावरती सिध्दी गोसावी, आराध्या कोरडे यांनी पोवाडा सादर केला.शिक्षक मनोगतातून उर्मिला निरगुडे यांनी सामाजिक कार्य सांगितले.अध्यक्षीय मनोगतातून ज्ञानेश्वर शिंदे यांनी बाळ गंगाधर टिळक एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी एक होते.”स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच.”टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना “भारतीय असंतोषाचे जनक” म्हणले. त्यांना “लोकमान्य” ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ “लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला” असा होतो.महात्मा गांधींनी त्यांना “आधुनिक भारताचा निर्माता” तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक जहालवादी नेते होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात हे सांगितले.कार्यक्रमाचे फलक लेखन रुपाली शेडगे यांनी केले.सुत्रसंचलन व आभार प्रांजल बागल हिने केले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
